Agriculture buy rule : देशातील सर्वाधिक नागरीक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती व्यवसाय करायचा म्हटलं की शेतजमीन आलीच. मग या शेतजमिनी बाबत देखील अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. काही शेतकऱ्यांना आपल्या पूर्वजाकडून जमीन मिळालेले असते. तर काही शेतकरी नव्याने शेत जमीन खरेदी करून त्यावर आपला शेती हा व्यवसाय सुरू करतात. मग ही शेत जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी (Agriculture buy rule) तपासाव्या जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही किंवा शेतकऱ्यांना नंतर कोणत्या अडचणीचा सामना करण्याची आवश्यकता पडणार नाही.
शेतजमीन खरेदी करताना जमिनीचा व्यवहार करण्याआधी त्याबाबतच्या सर्व कागदपत्रांच्या बाबी आणि इतर बाबी तपासणी आवश्यक आहे. जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर आपल्याला भविष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही शेत जमिनीचा व्यवहार करण्याआधी आपण काही मुद्द्यांचा विचार करून त्या गोष्टीची तपासणी केली पाहिजे. Agriculture buy rule

जमिनीसाठी रस्ता आहे का
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीत जाण्यासाठी शेत रस्ता उपलब्ध आहे का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण त्या शेतजमिनीसाठी असणारा रस्ता कागदपत्रावर नोंद आहे का नकाशा मध्ये त्याची नोंद आहे काय हे देखील पाहने आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा शेत रस्ता हा आपणास दिसत असतो : परंतु त्या रत्याची कागदपत्रावर कुठेही नोंद नसल्यामुळे भविष्यात हा शेत रस्ता ज्याच्या मालकीच्या आहे. तो त्याच्यावर त्याचा हक्क बजावतो आणि आपल्याला आपल्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता शिल्लक राहत नाही. मग आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये विशेषता शेत जमिनीसाठी यंत्रसामग्री पोहोचवणे, शेतातून मिळालेले उत्पादन वाहतूक करणे, तसेच सिंचनासाठी विविध सुविधा उपलब्ध करणे, मजूर तिथपर्यंत नेण्यासाठी अशा विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना रस्ता ही प्रमुख बाजू पहिल्यांदा तपासून घेणे आवश्यक आहे. Agriculture buy rule
हे वाचा : मोफत करा वारसाची सातबारेवर नोंद…
जमिनीच्या चतु:सीमा तपासा
शेत रस्त्याप्रमाणेच चतुर सीमाचा देखील विचार करणं आवश्यक आहे. ज्या जमिनीचा आपण व्यवहार करत आहोत ती जमीन व त्याच्या बाजूला असणारे शेतकरी कोणते आहेत. तेथील रस्ता अधिकृत आहे का? वरील मुद्द्यात पाहिल्याप्रमाणे केवळ तोंडी असणारा रस्ता आपल्यासाठी भविष्यात अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे व्यवहार करताना शेजारील चारी बाजूच्या शेतकऱ्यांना कुठून रस्ता आहे तसेच हा रस्ता आपला देखील वापरात येतो का? अधिकृतपणे या रस्त्याची नोंद कागदपत्रावर आहे का हे पहावे. Agriculture buy rule
जमिनीचा सातबारा फेरफार तपासा
वरील मुद्द्यासोबतच जमिनीचा सातबारा आणि फेरफार तपासणी देखील महत्त्वाचे आहे. जमिनीचा फेरफार मिळवून या जमिनीवर इतर कोणाचा हक्क आहे का याची देखील तपासणी करावी. आपल्याला जमिनीचा नकाशा आणि फेरफार याच्या माध्यमातून रस्ता सरकारी आहे किंवा खाजगी आहे याची देखील माहिती स्पष्ट होऊ शकते. जमिनीचा व्यवहार करताना बऱ्याच वेळा तोंडी शब्द देऊन व्यवहार पूर्ण केले जातात. परंतु नंतर काही दिवसांनी भविष्यात या शब्दावर विश्वास न ठेवता कागदावर विश्वास ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना विश्वासापेक्षा वस्तुस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे.
जमीन खरेदी ही अत्यंत मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे हा असा व्यवहार करताना भावनिक निर्णय न घेता वस्तुस्थितीनुसार आणि कागदपत्राच्या आधार घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. रस्ता तसेच इतर हक्क या बाबींची पूर्ण तपासणी करूनच व्यवहार पूर्ण करावा. या गोष्टींची तपासणी न केल्यास आपल्याला भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊन आपल्याला कोर्ट कचेरी करण्याची वेळ आपल्यावर येते. कोर्ट कचेऱ्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होत होत शिवाय आर्थिक नुकसान देखील सहन करावा लागतं. त्यामुळे कोणत्याही जमीन खरेदी व्यवहार करताना या सर्व बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे. Agriculture buy rule