Srh vs gt: गुजरात टायटन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद काय आहे खेळाची स्थिती?

Srh vs gt: गुजरात टायटन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद काय आहे खेळाची स्थिती? रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी गुजरात टायटन आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएलचा 19 वा सामना खेळला जाणार आहे. यामध्ये कोणता संघ आघाडीवर राहील हे पाहणे महत्त्वाचे आहे. मागील तीन सामन्यांमध्ये पण हैदराबाद आपली कामगिरी चांगल्या प्रकारे करू शकले नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून चांगल्या प्रकारे खेळ खेळला जात होता. परंतु मागील तीन सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादला चांगला खेळ खेळता आला नाही.

Srh vs gt

यातच समोरील टीम गुजरात या टीमला देखील चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करता आलेला नाही. आजच्या या खेळाच्या माध्यमातून दोघांनाही करो किंवा मरो या परिस्थितीमध्ये खेळ पूर्ण करावा लागणार आहे. कारण गुजरातचे देखील यामागील सामन्यांमध्ये आयपीएल जिंकण्याच दृष्टीने कोणताही परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही.

Srh vs gt कोठे होणार सामना

आज खेळला जाणारा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन हा सामना. हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जाणार आहे. या खेळाची सुरुवात रात्री सात वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. या खेळाचा टॉस सात वाजता पूर्ण होईल. आयपीएल मधील 19 वा सामना हा अत्यंत अटीतटीचा सामना होणार आहे. कारण एका बाजूला सनरायझर्स हैदराबादचे बॅट्समन तर दुसऱ्या बाजूला गुजरात टायटनचे शानदार गोलंदाज यांच्यासमोर कितपत सनरायझर्स हैदराबाद आपले अस्तित्व दाखवते हे पाहणे महत्त्वाचे असेल. त्याचप्रमाणे गुजरातकडे देखील हीच परिस्थिती कारण हैदराबादच्या बॅट्समन चा विचार करता गुजरातच्या बॅट्समन मध्ये त्या पद्धतीने रन बनवण्याचा वेग दिसून येत नाही. आयपीएल क्षेत्रात सर्वाधिक टारगेट देणारी टीम सनरायझर्स हैदराबाद गुजरातच्या समोर असणार आहे. Srh vs gt

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Leave a comment