agrim crop insurance : मागील चार ते पाच महिन्यापासून शेतकऱ्यांना अग्रीन पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. अग्रीम पिक विमा मंजूर करून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा जमा करण्यात आला नव्हता. आता राज्य शासनाने पिक विमा कंपनीला राज्य शासन हिस्सा रक्कम जमा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज पासून शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 335.90 कोटी रुपयांचा अग्री पिक विमा वाटप केला जाणार आहे.
राज्य शासनाने पिक विमा कंपनीला शासन हिश्याची रक्कम वाटप करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करून परवानगी दिली होती. यानुसार राज्यातील सर्वच पिक विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार राज्यातील सर्व पिक विमा कंपन्यांना पिक विमा रक्कम जमा करण्यात आली आहे. यानुसारच आता राज्यातील पिक विम्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची वाटप केली जाणार आहे. agrim crop insurance

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणार अग्रीम पिक विमा
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिक विमा अग्रीमचे वाटप सुरू केले जाणार आहे. बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पिक विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम वाटप करण्याबाबतच्या सूचना राज्य कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर झालेला आहे किंवा ज्या जिल्ह्यात अग्रीम पिक विमा मंजूर केला आहे अशा सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीम वाटप करण्याबाबतचे आदेश कंपनीला दिले होते. जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले असताना देखील पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा जमा करण्यास टाळाटाळ केली होती. यावेळी कंपनीकडे विचारणा केली असता कंपनीने राज्य शासन हिश्याची रक्कम जमा न झाल्याचे कारण दिले होते. आता राज्य शासन हिस्सा रक्कम देखील कंपनीला मिळाल्यामुळे कंपनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात करत आहे. agrim crop insurance
हे वाचा : शेतकरी ओळखपत्र काढले का ? तरच मिळेल शासकीय योजनांचा लाभ.
शेतकरी आंदोलन आणि लोकप्रतिनिधींची मागणी
अनेक शेतकऱ्यांनी अग्रिम (agrim crop insurance) पिक विमा मंजूर असून देखील वाटप होत नसल्याच्या तक्रारी पिक विमा कंपनी तसेच कृषी कार्यालयास सादर केल्या होत्या. यानुसारच लोकप्रतिनिध देखील अधिवेशनादरम्यान पिक विमा वाटपाबाबतचा मुद्दा उचलला होता. या मुद्द्यावर उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम जमा केली जाईल अशी ग्वाही दिली होती. परंतु या शब्दात तथ्य नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. कारण दिलेला शब्द कृषिमंत्र्याचा खोटा ठरला होता. आता पिक विमा कंपन्याकडून आलेल्या माहितीनुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. agrim crop insurance
इतर जिल्ह्यातील स्थिती
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम (agrim crop insurance) वाटपाबाबतची प्रक्रिया कंपनीने सुरू केली असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. परंतु इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न देखील शेतकऱ्याचे मनात निर्माण झाला आहे? राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यातील कंपन्यांना निधी मंजूर केलेला आहे. यानुसार कंपनीच्या बँक खात्यावर रक्कम देखील जमा झाली आहे. पिक विमा कंपन्याकडून पुढील प्रक्रिया पूर्ण करून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पिक विमा मंजूर असणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याचे रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 2555 कोटींचे वाटप
राज्य सरकारने निधी मंजूर करताना राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी 2555 कोटी रुपये निधी मंजूर केला होता. हा निधी राज्यातील कार्यरत असणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आला आहे. त्यानुसारच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पिक विमा मंजूर असणारे शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली जाणार आहे. या पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण 2555 कोटी रुपयांचे वाटप देखील केले जाणार आहे. agrim crop insurance