अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम पिक विमा मंजूर : Agrim Pik Vima Manjur 2024

Agrim Pik Vima Manjur 2024 मागील काही दिवसांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्वे विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त रित्या आठ दिवसांमध्ये पूर्ण करावे त्यापुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश कृषिमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीमध्ये दिले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सततच्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यामुळे तातडीने याबद्दल सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये पंधरा दिवसाच्या आत नमुना सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रतिनिधींना केले आहे. शेती पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीसाठी तातडीने पिक विमा कंपनी आणि कृषी विभाग यांना आठ दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करून पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अधिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी अग्रीम पीक विमा मिळायला हवा असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत

पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया

Agrim Pik Vima Manjur 2024 बैठकीसाठी उपस्थित अधिकारी :

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवरती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण, जिल्हा कृषी परीक्षक बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह विमा कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

15 दिवसात नमुना सर्वेक्षण करण्याचे आदेश :

Agrim Pik Vima Manjur 2024 या बैठकीमध्ये पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना पुढील आठवड्यामध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने नमुना सर्वेक्षण करून पुढील पंधरा दिवसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा चा लाभ मिळण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत.या बैठकीमध्ये पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना पंधरा दिवसाच्या आत नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईचा अग्रीम पिक विमा मिळावा असे आदेश दिलेले आहेत.

नमुना सर्वेक्षण करत असताना कोणत्याही प्रकारच्या चुका अथवा दुर्लक्ष पीक विमा कंपन्यांकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर ती थेट गुन्हा दाखल केला जाईल असेही निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी दिल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल मंडळातील नुकसानीच्या भरपाईचे नैसर्गिक आपत्ती अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनासाठी तात्काळ सादर करावेत असेही निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. Agrim Pik Vima Manjur 2024

Leave a comment