agristack ragistation : केंद्र सरकारने देशांमध्ये ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात मंजुरी दिलेली आहे. या योजनेचे अंतर्गत देशातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या विशिष्ट ओळख क्रमांकाच्या आधारेच यापुढे शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. या विशिष्ट क्रमांकाच्या साह्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे तपशील पिकाची तपशील खत बी बियाणे या सर्व घटकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने देशात हा प्रोजेक्ट राबवला आहे.
देशातील कृषी क्षेत्राला डिजिटल सेवांचा आधार मिळावा. विविध शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने व परिणामकारकरीत्या देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा यासाठीच केंद्र सरकारने ॲग्री स्टॅक डिजिटल एग्रीकल्चर मिशन योजना सुरू केली. यापुढे या ॲग्री स्टॅक ओळखपत्राच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील सर्व शेतकऱ्यांकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

असे काढा शेतकरी ओळखपत्र agristack ragistation
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. या संकेतस्थळावर जाऊन राज्यातील शेतकरी आपले शेतकरी ओळखपत्र काढू शकतात. यासोबतच आपल्या जवळील सीएससी केंद्रावर देखील आपण शेतकरी ओळखपत्र काढू शकता. केंद्रावर शेतकरी ओळखपत्र नोंदणी मोफत उपलब्ध आहे. जर अद्याप पर्यंत आपण शेतकरी ओळखपत्र साठी नोंदणी केली नसेल तर आपण तात्काळ शेतकरी ओळखपत्र नोंदणी पूर्ण करून घ्यावी.
आपण स्वतः देखील घरबसल्या आपल्या शेतकरी ओळखपत्र काढू शकतात. घरबसल्या शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आपल्याला https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ संकेतस्थळावर जावे लागेल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्यासमोर शेतकरी ओळखपत्र नोंदणीचे पेज उपलब्ध होईल. यामध्ये आपल्याला विचारलेली आवश्यक माहिती भरून आपली नोंदणी सबमिट करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
शेतकरी ओळखपत्राचे फायदे
केंद्र सरकारने सुरू केलेली ॲग्रीस्टॅक योजना शेतकऱ्यांना डिजिटल स्वरूपात सुविधा देण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी या शेतकऱ्यांचा खूप फायदा होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदी खते बी बियाण्यांच्या नोंदी पीक विमा यासारख्या घटकांमध्ये नोंदणी करण्यासाठी कमी कागदपत्राच्या माध्यमातून नोंदणी साध्य करता येणार आहे.
या शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान योजना पिक विमा योजना पीक कर्ज यासारख्या सरकारी योजनांचा तात्काळ लाभ दिला जाईल. या शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावाने आपले पीक विकण्यासाठी नोंदणी करण्याचे प्रक्रियेमध्ये पूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात निर्माण होईल.
3 thoughts on “agristack ragistation: शेतकरी ओळखपत्र काढले का ? तरच मिळेल शासकीय योजनांचा लाभ.”