गणेशउत्सवात राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा.
गणेशउत्सवात राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा.
महाराष्ट राज्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना गणेश उस्तव व गौरी उत्सवा निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षन विभागाने परवानगी दिली आहे.

महाराष्ट राज्य सरकार कडून काही विशिष्ट कार्यक्रमाचे अवचित साधून राज्यातील पात्र लाभार्थी यांना आनंदाचाशिधा वाटप केला जातो. (उदा. दिवाळी /गुडीपाढवा/ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती/ गौरी गणपती उस्तव / छत्रपती शिवाजी महाराज जयंती/ श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा) याच धर्तीवर राज्य सरकार कडून 2024 मधील गौरी व गणेश उत्सव या सणाला पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचाशिधा वाटप करण्यात येणार आहे.
योजनेचे नाव | आनंदाचा शिधा |
कोणामार्फत राबवली जाणार | |
विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्रातील पात्र शिधापत्रिका धारक |
लाभ | आनंदाचाशिधा सवलतीत वाटप करणे |
कोणते घटक मिळणार | 1 किलो रवा ,1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर, 1 लीटर सोयाबीन तेल. |
कोणाला मिळणार आनंदाचाशिधा
- अंत्योदय अन्न योजेमधील लाभार्थी
- प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक
- छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्व जिल्हे.
- नागपूर विभागातील सर्व जिल्हे.
- 14 शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी.
आनंदाचाशिधा मध्ये कोणत्या वस्तु मिळणार
- 1 किलो रवा
- 1 किलो चणाडाळ
- 1 किलो साखर
- 1 लीटर सोयाबीन तेल
आनंदाचाशिधा वाटपाचा कालावधी
दिनांक 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या एक महिन्याच्या कावधीत वाटप करणे.
आनंदाचाशिधा वाटपाची किंमत
आनंदाचाशिधा वाटप करतांना लाभार्थी यांना 100 रुपये(सवलतीच्या दरात) प्रतिसंच देणे आवश्यक आहे.
2 thoughts on “गणेशउत्सवात राशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा”