Annasaheb Patil Karj Yojana अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची फसवणूक

Annasaheb Patil Karj Yojana : जुन्नर तालुक्यात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतीसाठी कुकुटपालन, गाईगोठा यांसारख्या प्रकल्पांसाठी 25 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नर तालुक्यातिल या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि संतापाचे वातावरण आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Annasaheb Patil Karj Yojana

Annasaheb Patil Karj Yojana कर्ज मंजुरीचे आमिष

शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस ठाण्यात दोन जनावर गुनादाखल करण्यात आला . त्या आरोपीची नावे शशिकांत नामदेव कुऱ्हाडे (रा. आळे) आणि भाऊसाहेब नाना बोरचटे (रा. बेल्हे, ता. जुन्नर) जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत नामदेव कुऱ्हाडे, भाऊसाहेब नाना बोरचटे या दोन आरोपीनी 25 ऑक्टोबर 2024 रोजी अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil Karj Yojana) आर्थिक विकास महामंडळामध्ये कमाल आहे आणि शेतकऱ्यांना शेती निगडित कुक्कुटपालन, गाय गोठा आशा योजनांसाठी शासनाच्या माध्यमातून  25 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मंजूर करून देतो असे संजय विलास पिंगट यांनी आमिष दाखवले. आणि आरोपींनी हे कर्ज मंजूर करून घेण्यासाठी वेळोवेळी शेतकऱ्याकडून एकूण 4 लाख 98 हजार 900 रुपये घेतले. आणि त्या नंतर कर्जप्रकरण मंजुर करणे असे म्हणत म्हणत घेतलेली एकुण रक्कम परत न करता फसवणुक केली.आशा प्रकारे गावातील बऱ्याच शेतकऱ्याची फसवणूक केली .

हे वाचा : मुलींच्या मोफत शिक्षणासाठी चंद्रकांत पाटलांची महत्त्वपूर्ण घोषणा!

अनेक शेतकऱ्यांची फसवणूक

या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत असून, सुनिता रमेश बांगर, कविता किशोर तांबे, सारीका सचिन बोरचटे, वंदना भास्कर नरवडे, सुवर्णा ईश्वर पिंगट, कविता सुभाष बोरचटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे ,असे पिंगट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सुरूच आहे . या दोणी आरोपींनी आपले घरच आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ (Annasaheb Patil Karj Yojana) योजनेचे ऑफिस थाटून जुन्नर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांकडून मोठमोठ्या रक्कमा उकळून त्यांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांची कारवाई

पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात, बेल्हे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, यातील एक आरोपी आंबेगाव तालुक्यातही अशाच स्वरूपाच्या फसवणुकीत सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांची सावधगिरी आवश्यक

या घटनेवरून शेतकऱ्यांनी कोणत्याही योजनांची खातरजमा न करता पैसे देऊ नयेत, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे. शासनाच्या अधिकृत कार्यालयांशी संपर्क साधूनच आर्थिक व्यवहार करावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणीही शेतकरी करत आहेत.

या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. Annasaheb Patil Karj Yojana

Leave a comment

Close Visit Batmya360