ativrushti nukasan bharpai आज आपण या लेखांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाबद्दल माहिती पाहणार आहोत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यात आले परंतु सरकारकडून नुकसान भरपाई देण्याचे आवाहन करण्यात आले होते पण त्यास विलंब झाला आणि त्या काळामध्येच आचारसंहिता लागू झाली परंतु आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप करण्यात येईल का असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे.
ativrushti nukasan bharpai 2019 मध्ये नुकसान याच पद्धतीने दिली होती भरपाई
याच्या अगोदरही 2019 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेला होता. परंतु त्यावेळेस राज्य पालनाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विचार करून नुकसान भरपाई देण्यात आली होती. 2019 मध्ये 5 हजार 800 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. आणि आता सध्या परिस्थिती तशीच आहे. त्या अंदाजानुसार यावर्षीही नुकसान भरपाई दिवाळीनंतर देण्यात येईल.
यावर्षी अतिवृष्टी नुकसान भरपाई
ativrushti nukasan bharpai अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेले नुकसान अहवाल शासनाला सादर करण्यात आलेले आहेत. परभणी आणि लातूर या दोन्ही जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी 550 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि 350 कोटी रुपये लातूर जिल्ह्यासाठी आणि बीडसाठी 50 कोटी रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि उर्वरित रक्कम ही नांदेड, हिंगोली, नाशिक ,धाराशिव, छत्रपती संभाजीनगर ,विदर्भातील काही जिल्हे, सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची प्रतीक्षा होती 15 जिल्ह्यांमध्ये 19 लाख पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहे. आता या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे
हे वाचा: तीन दिवस राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या राहणार बंद.
आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मुख्य सचिवांच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. ज्याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून सात जिल्ह्यासाठी 997 कोटी रुपये मंजूर केले होते. याच्यामध्ये लातूर आणि परभणी या जिल्ह्यासाठी सर्वात मोठी रक्कम होती. याच्या अगोदरही 237 कोटी रुपये जून जुलै आणि ऑगस्ट साठी मंजूर केलेली होती. याच्या व्यतिरिक्त 2200 ते 2300 कोटी नुकसान भरपाई ची प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. एकत्रित रक्कम पाहिले तर 3 हजार 600 कोटी रुपयांची रक्कम ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेली आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुरी
सचिव स्तरावरून कृषी विभागाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे परवानगी देण्यात आली तर दिवाळी नंतर आठ ते दहा दिवसांमध्ये किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येईल. अशा प्रकारचा अंदाज आहे. यामध्ये पाहिलं तर सर्वात जास्त नुकसान हिंगोली या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तसेच बुलढाणा, अकोला, यवतमाळ, धाराशिव ,छत्रपती संभाजी नगर ,पश्चिम महाराष्ट्रात , विदर्भातील, अतिवृष्टीमुळे झालेले झालेली ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या कालावधीमध्ये नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मंजुरी दिली तर अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप करण्यात येईल.