bajanar samiti update : राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकींचा धुमाकूळ सुरू आहे तर दुसरीकडे दिवाळीची आनंद पाहायला मिळत आहे. दिवाळी सणानिमित्त राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. याबाबत संबंधित विभागाने आदेश दिले आहेत. याप्रमाणे ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्या बंद असणार आहेत. यावरून सोलापूर बाजार समिती आणि बीडमधील रेशीम कोष खरेदी मार्केट समितीने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारात आणू नये, असे आवाहन देखील केले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकींची धुमाकूळ सुरू आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे. यामुळे सध्या राज्याच्या विविध मतदार संघात सोमवारी (ता.२८) वसुबारसच्या मुहूर्तावर अर्ज भरण्यासाठी बहुतांश नेते घराबाहेर पडले आहेत. याचदरम्यान दिवाळी निमित्त ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्या बंद असणार आहेत. तसेच १ ते ३ नोव्हेंबर असे तीन दिवस बँकादेखील बंद असणार असून मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय पण ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे.
bajanar samiti update राज्यातील सोलापूर बाजार समिती कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे कांद्याची आवक सध्या वाढत असून दररोज सरासरी २०० ते ३०० ट्रक कांद्याची आवक सोलापूर बाजार समिति मध्ये होत आहे. तर मागील पाच दिवसांमध्ये दोन हजार ट्रक कांद्याची आवक सोलापूर येथील बाजार पेठेत झाली आहे. त्याचबरोबर सोयाबीन, उडीद, गूळ, सीताफळ, डाळींब आणि पेरूची देखील आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. याचदरम्यान आता बाजार समितीतील व्यवहार पुढील चार दिवस बंद राहणार आहे.
नरक चतुर्दशी (दिनांक ३१) लक्ष्मीपूजन (दिनांक १ नोव्हेंबर) आणि बलिप्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा शनिवारी (दिनांक २ नोव्हेंबर) असल्याने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. शिवाय रविवारी (दिनांक. ३) भाऊबीज असल्याने देखील कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असणार आहे. यामुळे बाजार समितीत सर्व व्यवहार बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवेत भाजीपाला येत असल्याने भाजीपाला मार्केट नेहमी प्रमाणे सुरू असेल, अशी माहिती समिती प्रशासनाने दिली आहे.
दिवाळी सणानिमित्त बाजार समितीतील अनेक दुकाने ही लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्या निमित्त सुरू असणार आहेत. यावेळी कांदा मार्केटमधील अडते पाडव्याच्या मुहूर्तावर व्यापार करतात. यावेळी मार्केटमध्ये कांद्याला अतिशय चांगला भाव मिळेल, अशी माहिती व्यापाऱ्याने दिली आहे.
हे वाचा: टोकन यंत्र साठी किती मिळते अनुदान पहा संपूर्ण माहिती
bajanar samiti update बीड बाजार समिति राहणार सुरू
दरम्यान बीड मधील रेशीम कोष खरेदीसाठी प्रसिद्ध असणारे छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीने देखील दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. समितीने, लक्ष्मी पुजन दिवशी बीड रेशीम कोष खरेदी मार्केट बंद राहील. पण बलिप्रतिपदा दिपावली पाडव्याला मार्केट नेहमी प्रमाणे चालू राहील, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक श्री. धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे.
मुद्रांक शुल्क विभागासह बँकाही बंद
या वर्षी दिवाळीची सुरूवात गुरूवारपासून (दिनांक ३१ ऑक्टोबर) होत आहे. तर नरक चतुर्दशी शुक्रवारी (दिनांक १ नोव्हेंबर) लक्ष्मीपूजन, शनिवारी (दिनांक २ नोव्हेंबर) आणि ३ तारखेला रविवारी असून याच दिवशी भाऊबीज आहे. असे चार दिवस सलग सुट्ट्या असल्याने सर्वच बँका बंद असणार आहेत. या सोबतच दिवाळी मध्ये मुद्रांक शुल्क विभागाची कार्यालये सुद्धा बंद राहणार आहेत. यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार देखील बंद राहणार असून प्लॉट, जमीन, घर खरेदी- विक्रीचे व्यवहार पुढील दोन दिवसात पूर्ण करावे लागणार आहेत. तर बँकासह कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पुढील सोमवार पासून म्हणजे (दिनांक ४ नोव्हेंबर) सुरळीत सुरू होईल.
3 thoughts on “तीन दिवस राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या राहणार बंद. bajanar samiti update”