ativrushti nuksan bharpai kyc 2024 खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला होता. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याबाबतची सूचना देखील देण्यात आल्या होत्या. आता या अनुदान वितरण करण्याबाबत याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केलं जात आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी तसेच पूर या कारणामुळे शेत पिकाची नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता. यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यासाठी स्थानिक स्तरावरून प्रक्रिया राबवण्यात आली.
स्थानिक स्तरावरून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. या याद्याच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला. या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना आपले अनुदान मिळवण्यासाठी ई केवायसी करणं देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? पहा सविस्तर.
ativrushti nuksan bharpai kyc 2024 केवायसी कुठे करावी
अतिवृष्टी अनुदान 2024 याची केवायसी करण्यासाठी आपण स्वतः या प्रकारचे केवायसी करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊनच आपली केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्याला आपला विशिष्ट क्रमांक माहीत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक तहसील कार्यालया मार्फत तयार केलेला जात आहे. ज्या शेतकऱ्यांचा विशिष्ट क्रमांक तयार झाला आहे या शेतकऱ्यांना आपली ई केवायसी पूर्ण करता येणार आहे.
विशिष्ट क्रमांक कोठे मिळेल
ativrushti nuksan bharpai kyc 2024 बऱ्याच शेतकऱ्यांना आपला विशिष्ट क्रमांक कुठून मिळवावा किंवा आपल्याला विशिष्ट क्रमांक कसा मिळेल याबाबतची शंका निर्माण होते. ज्या शेतकऱ्यांना आपला विशिष्ट क्रमांक हवा आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, आणि आपल्या गावची विशिष्ट क्रमांक तयार केलेली यादी मागून घ्यावी. या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याचे बाधित क्षेत्र शेतकऱ्याला मिळणारे अनुदान त्यासोबतच शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक देखील समाविष्ट केलेला असतो. या विशिष्ट क्रमांकाच्या आधारेच आपण आपली अनुदान ई केवायसी पूर्ण करू शकता.
तरच मिळेल अनुदान
ज्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आपली इ केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे (ativrushti nuksan bharpai kyc 2024). ई केवायसी पूर्ण केली तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते. ई केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम ही वितरित केली जाते. त्यामुळे ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत आपली केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली इ केवायसी करून घ्यावी. ही केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र याच्याशी संपर्क साधून आपली केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
डीबीटी अंतर्गतच मिळणार लाभ
अनुदान केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत लाभ वितरित केला जाणार आहे. त्या साठी सर्व शेतकऱ्यांनी आपले डीबीटी बँक खाते सुरू असल्याची खात्री करावी. जेणे करून अनुदान केवायसी केल्यानंतर लाभ त्या बँक खात्यामध्ये जमा होईल. ativrushti nuksan bharpai kyc 2024
1 thought on “ativrushti nuksan bharpai kyc 2024 : शेतकाऱ्यांनो केवायसी करा तरच मिळेल अतिवृष्टी अनुदान.”