Automated Chargeback :UPI वापरणाऱ्यांसाठी खुशखबर,ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू, गेलेले पैसे लगेच खात्यात.

Automated Chargeback : यूपीआय व्यवहारात अडचण, ट्रान्झॅक्शन फेल होणे किंवा इंटरनेट समस्येमुळे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 15 फेब्रुवारी 2025 पासून देशभरात ऑटोमेटेड चार्जबॅक (Automated Chargeback) प्रणाली लागू केली आहे. या निर्णयामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Automated Chargeback

ऑटोमेटेड चार्जबॅक (Automated Chargeback) प्रणाली म्हणजे काय?

व्यवहार फेल झाल्यानंतर किंवा अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी यापूर्वी बँकेत तक्रार करावी लागत होती . मात्र, आता ही प्रक्रिया स्वयंचलित करण्यात आली आहे. ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास बँक चार्जबॅक (Automated Chargeback) विनंती स्वीकारून तात्काळ पैसे परत करेल. यामुळे रिफंड प्रक्रिया वेगवान, सुलभ आणि पारदर्शक होईल.

हे वाचा : न्यायालयाचा आदेश; जिल्हाधिकारी याची गडीच जप्त.

पैसे कसे परत मिळणार?

  1. यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे व्यवहार करताना पैसे अडकले किंवा ट्रान्झॅक्शन फेल झाले, तर स्वयंचलित चार्जबॅक प्रक्रिया सुरू होईल.
  2. यासाठी ग्राहकाने बँकेत जाऊन तक्रार करण्याची गरज नाही.
  3. बँक फेल झालेल्या व्यवहाराची तपासणी करून खात्यात पैसे परत करेल.

चार्जबॅक व रिफंडमध्ये काय फरक आहे?

चार्जबॅक :

  • ग्राहकाने बँकेकडे तक्रार केली की, बँक संबंधित व्यवहार तपासून पैसे परत करते.
  • फसवणूक, तांत्रिक अडचण किंवा अपूर्ण व्यवहाराच्या वेळी वापरले जाते.

रिफंड :

  • ग्राहकाला पैसे परत मिळवण्यासाठी सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा लागतो.
  • वस्तू परत दिली किंवा सेवा मिळाली नाही, अशा वेळी वापरले जाते.

चार्जबॅकची गरज कधी भासते?

  • व्यवहार अपूर्ण राहिल्यास
  • इंटरनेट समस्येमुळे ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास
  • एकाच व्यवहारासाठी पैसे वारंवार कट झाल्यास
  • फसवणुकीमुळे पैसे गहाळ झाल्यास

तक्रार कुठे करायची?

यूपीआय किंवा नेटबँकिंग व्यवहारात समस्या आल्यास, NPCI च्या टोल-फ्री क्रमांक 18001201740 वर कॉल करून तक्रार नोंदवता येईल. व्यवहाराची माहिती देताना ट्रान्झॅक्शन आयडी, तारीख व रकमेचा तपशील द्यावा.

निष्कर्ष

यूपीआय व्यवहारात अडकल्यास ग्राहकांना आता तक्रारीसाठी अनेक दिवस थांबावे लागणार नाही. स्वयंचलित चार्जबॅक प्रणालीमुळे पैसे तत्काळ खात्यात जमा होणार आहेत. NPCI च्या या निर्णयामुळे डिजिटल व्यवहार अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित होतील. Automated Chargeback

1 thought on “Automated Chargeback :UPI वापरणाऱ्यांसाठी खुशखबर,ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू, गेलेले पैसे लगेच खात्यात.”

Leave a comment

Close Visit Batmya360