PFMS Payment Status :अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात आले का नाही? नेमके कोणत्या योजनेचे पैसे खात्यात आले ते जाणून घ्या…

PFMS Payment Status : शासनाच्या योजनेअंतर्गत अनेक आर्थिक लाभ देणाऱ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदानाच्या योजना देखील राबवल्या जातात. जर तुम्ही पण एखाद्या अनुदानाची वाट पाहत असाल आणि ते अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? किंवा जर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नेमके कशाचे आहेत? हे जर लक्षात येत नसेल तर अशा वेळेस जेव्हा अनुदान येणार होते ते आले का नाही किंवा आपल्या खात्यामध्ये जे पैसे येत आहेत ते कशाचे आहेत? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो, तर हा लेख तुम्हाला या समस्येवर मार्गदर्शन करेल.PFMS Payment Status

PFMS Payment Status

शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची जमा प्रक्रिया

अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे (PFMS Payment Status) जमा होत आहेत. त्यात पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी सिंचन योजना यांसह इतर योजनांचा समावेश आहे. हे अनुदान “महाडीबीटी” पोर्टलच्या माध्यमातून वितरित केले जाते.

विशेषतः १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये, जसे की विदर्भ, मराठवाडा आणि अन्य ठिकाणी, रेशन बंद करून शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये रोख स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.पन मात्र, नेमके कोणत्या अनुदानाचे पैसे आले हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. तर हे कसे जाणून घ्यायचे याबद्दल आपण आज या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : UPI वापरणाऱ्यांसाठी खुशखबर,ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू, गेलेले पैसे लगेच खात्यात.

कोणत्या अनुदानाचे पैसे आले आहेत हे कसे तपासाल?

तुमच्या खात्यात कोणत्या योजनेचे पैसे (PFMS Payment Status) जमा झाले आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील प्रक्रिया अवलंबा:

  • कोणत्या अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला या संकेतस्थळावर गेल्यानंतर चौथ्या पर्याय वर म्हणजेच पेमेंट स्टेटस या पर्यावरण क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर No युवर पेमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • या पर्यावरण क्लिक केल्यानंतर पुढील विंडोमध्ये पेमेंट बाय अकाउंट नंबर पाशी विंडो दिसेल.
  • यात सुरुवातीला तुम्ही वापरत असलेल्या बँकेची निवड करून घ्यायची आहे.
  • त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म करण्यासाठी पुन्हा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये कॅप्चर कोड टाकायचा आहे.
  • कॅप्चर कोड टाकून झाल्यानंतर तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल.
  • त्यानंतर तो ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकून झाल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावरील माहिती तुम्हाला खाली पूर्ण सविस्तरपणे दाखवली जाईल.
  • यामध्ये कोणत्या योजनेचे अनुदान कोणत्या दिवशी आले आहे व किती आले आहे हे सर्व तपशील दाखवला जाईल.
  • अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रत्येक अनुदानाची माहिती मिळवता येणार आहे.

कोणती माहिती दिसेल?

  • अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत आले आहे?
  • अनुदानाची रक्कम किती आहे?
  • पैसे खात्यात जमा झालेली तारीख.

शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजनांतर्गत मदत करते, मात्र अनुदानाची माहिती न मिळाल्याने गोंधळ निर्माण होतो. वरील सोपी प्रक्रिया करून तुम्ही घरबसल्या आपल्या खात्यातील अनुदानाची सविस्तर माहिती मिळवू शकता.PFMS Payment Status

Leave a comment