Google Pay Voice AI : Gpay वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवं AI फिचर लॉन्च,पहा सविस्तर माहिती .

Google Pay Voice AI : ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांचं प्रमाण मागील काही वर्षांमध्ये प्रचंड वाढलं आहे. क्यूआर कोड आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून होणारे व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी एक रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत कोणाला पैसे पाठवायचे असतील, तरीही ‘गूगल पे’ सारख्या सेवांचा 24 तास वापर केला जातो. जर तुम्ही एखादी वस्तू घेतली आणि पैसे देण्यासाठी दुकानदाराकडे स्कॅनर किंवा मोबाईल नंबर च्या मदतीने गुगल पे ॲपवरून पेमेंट करता येते. पण मात्र एखाद्या वेळेस घाई गडबडीमध्ये रकमेच्या जागी चुकून पिन नंबर टाकला जातो किंवा चुकीची रक्कम टाकण्यात येते आणि अशा टाईमला घोळ होतो. अशा चुका लक्षात घेऊन, त्या परत होऊ नये म्हणून गुगल पे ने एक नंव खास फिचर लॉन्च केले आहे .

Google Pay Voice AI

Google Pay Voice AI काय आहे हे फीचर?

‘गूगल पे’ने आपल्या वापरकर्त्यांसाठी पेमेंट करताना वापरता येईल असे एआय फीचर्स (Google Pay Voice AI) सुरू केले आहे .ज्याच्या मदतीने आता सर्वसामान्य नागरिकांना गुगल पे वर पेमेंट करताना फक्त बोलून म्हणजेच व्हॉइस कमांडद्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आता तुम्ही फक्त बोलून UPI पेमेंट करू शकता. भारतातील ‘गूगल पे’चे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक शरथ बुलुसु यांनी या नव्या फीचरबाबत माहिती दिली आहे. या Voice Assistance Feature मुळे डिजिटल पेमेंट प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे.

हे वाचा :अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात आले का नाही? नेमके कोणत्या योजनेचे पैसे खात्यात आले ते जाणून घ्या…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

व्हॉईस फीचरची वैशिष्ट्ये

  • सोपी पेमेंट प्रक्रिया:
    • टेक्नोलॉजीमध्ये फारशी गती नसलेल्या वापरकर्त्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे.
  • बहुभाषिक समर्थन:
    • स्थानिक भाषांमध्येही हा फीचर वापरण्यास उपलब्ध असेल.
  • ट्रान्सफॉर्मेटिव्ह व्हॉईस टेक्नॉलॉजी:
    • गुगलने भारत सरकारसोबत भागीदारी करत हा एआय प्रकल्प राबवला आहे.

सुरक्षित व्यवहारासाठी प्रयत्न

भारतातील सायबर फसवणूक सामना करण्यासाठी गुगल मशीन लर्निंग आणि एआय (Google Pay Voice AI) तंत्रज्ञानामध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करत आहे या फीचरमुळे ग्राहकांना घोटाळे आणि होणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकेल , असा विश्वास आहे .

UPI व्यवहारांमधील ‘गूगल पे’चा वाटा

नोव्हेंबर 2024 च्या अहवालानुसार:

  • गूगल पे: यूपीआय व्यवहारांमध्ये ‘गूगल पे’चा वाटा 37 टक्के वाटा आहे
  • फोन पे: तर फोन पेकडे 47.8 टक्के वाटा आहे

भारतातील एकूण UPI बाजारपेठेतील 80% पेक्षा जास्त वाटा या दोन प्लॅटफॉर्मकडे आहे. त्यामुळे हे नवं व्हॉईस (Google Pay Voice AI) फीचर गूगल पेच्या लोकप्रियतेत आणखी वाढ करू शकते.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

शेवटचा विचार

डिजिटल पेमेंट अधिक सोयीस्कर, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘गूगल पे’ने हे नवं AI फीचर आणलं आहे. त्यामुळे आता “बोलून पेमेंट” करण्याचा अनुभव प्रत्येकासाठी सहज आणि सुरक्षित होणार आहे. Google Pay Voice AI

Leave a comment