bachat gat tractor subsidy सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना आर्थिक स्वावलंबनासाठी मिनी ट्रॅक्टर आणि त्याची अवजारे पुरवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे .जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र असणाऱ्या बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे अहवाल समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कल्याण श्रीमती सुलेचना सोनवणे यांनी केले आहे .
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
- लाभार्थी पात्रता:
- अर्जदार बचत गटातील सदस्य असायला पाहिजे , तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- गटातील किमान 75% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असणे आवश्यक आहे.
- बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असावेत.
- अनुदान आणि खर्च मर्यादा:
- मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांच्या खरेदीसाठी कमाल मर्यादा ₹3,50,000 इतकी आहे.
- गटाला खरेदीच्या एकूण किमतीच्या 10% रक्कम स्वहिस्सा म्हणून भरावी लागेल.
- उर्वरित 90% (कमाल ₹3,15,000) रक्कम शासकीय अनुदानाद्वारे देण्यात येईल.
- आवश्यक कागदपत्रे:
- सर्व सदस्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड.
- सदस्यांचे रहिवासी प्रमाणपत्र (ग्रामसेवक, सरपंच किंवा तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र असावेत ).
- बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते, जे आधार कार्डशी संलग्न असावे.
- महत्त्वाचे अटी:
- ज्या लाभार्थ्यांनी पावर टिलर आणि मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ पुन्हा दिला जाणार नाही.
- स्वयंसहाय्यता गटाला योजनेचा लाभ मिळाल्यानंतर दिलेली साधने दुसऱ्या कोणाला विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाहीत.
bachat gat tractor subsidy अर्ज करण्याची प्रक्रिया:
- इच्छुक पात्र बचत गटांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, येथे अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.
- जर अर्जांची संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त असेल, तर लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.
योजनेमागील उद्देश:
bachat gat tractor subsidy ही योजना शेत संबंधित उपकरणे उपलब्ध करून देऊन बचत गटांच्या उत्पन्नवाढीस चालना देण्यासाठी राबवली जात आहे. गटांना स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख:
bachat gat tractor subsidy 31 डिसेंबर 2024 स्वयंसहाय्यता बचत गटांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह वेळेत अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. समाज कल्याण विभागाची ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि बचत गटांसाठी मोठा आधार ठरू शकते.
हे वाचा: पंतप्रधान पिक विमा योजनेतील 40,000 हेक्टरवर बोगस विमा घोटाळा
2 thoughts on “bachat gat tractor subsidy बचत गटांना आता मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांचा लाभ.”