अनाथ मुलांना मिळणार 2250 रुपये आर्थिक लाभ. BALSANGOPAN YOJANA

BALSANGOPAN YOJANA बालसंगोपन योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची योजना आहे, जी राज्यातील अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांच्या संगोपनासाठी तयार करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश गरजू मुलांना आधार देणे आणि त्यांच्या शैक्षणिक व मानसिक विकासास मदत करणे आहे. बालसंगोपन योजने अंतर्गत लाभार्थी मुलांना/मुलींना प्रतिमहिना 425 रुपये आर्थिक मदत दिली जाते , ज्याचा उपयोग त्यांच्या शिक्षण, आहार आणि इतर मूलभूत गरजांसाठी केला जातो. राज्यातील अनाथ व अर्ध अनाथ (आई किंवा वडील या एक नसणे) मुलांना या योजनेतून लाभ दिला जातो. या योजनेतून मुलांना त्यांचा शौक्षणिक खर्च व वैयक्तिक खर्च भागणवण्यास मदत मिळते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना

BALSANGOPAN YOJANA योजनेचा उद्देश

बालसंगोपन योजनेचा मुख्य उद्देश आहे की, अनाथ, अर्ध-अनाथ किंवा कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांना शासकीय मदत देणे. ही योजना मुलांच्या शैक्षणिक गरजा, आहार आणि इतर मूलभूत आवश्यकतांसाठी आर्थिक मदत पुरवते.

मिळणारा लाभ

आर्थिक मदत : या योजनेद्वारे मुलांना मासिक 425 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. हे सहाय्य त्यांच्या शिक्षण, आहार आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वापरले जाते.

  1. शैक्षणिक मदत: मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातात. शाळेतील फी, पुस्तकं, शालेय गणवेश आदी गोष्टींचे व्यवस्थापन योजनेद्वारे केले जाते.
  2. सुरक्षित संगोपन : अनाथ किंवा अर्ध-अनाथ मुलांना कुटुंबासारखे वातावरण देऊन त्यांचे सर्वांगीण संगोपन केले जाते. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
  3. समाजात स्थान : या योजनेद्वारे मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे ते भविष्यात समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतात.
  4. मानसिक संतुलन राखणे : ज्या मुलांना आई किंवा वडील नाहीत अश्या मुलांचे समाजात वावरताना मानसिक संतुलन बिगाडते ते सुधारण्यास मदत होईल.

पात्रता

  • अनाथ किंवा अर्ध-अनाथ मुलं: ज्या मुलांना कुटुंबातील सदस्यांचा आधार नाही किंवा ज्यांचे आई-वडील दोन्ही किंवा एक पालक जीवंत नाहीत, ती मुलं या योजनेसाठी पात्र आहेत.
  • वय: 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • कुटुंबाची आर्थिक स्थिती: कुटुंबातील उत्पन्न 2 लाख 50 हजार च्या आत असावे.

BALSANGOPAN YOJANA आवश्यक कागदपत्रे

  1. लाभार्थी मुलाचे जन्म प्रमाणपत्र
  2. पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (अनाथ मुलांसाठी)
  3. कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र (प्राधिकृत उत्पन्न प्रमाणपत्र)
  4. रहिवासी प्रमाणपत्र (रहिवाशी दाखल)
  5. शाळेचे प्रमाणपत्र. (बोनाफाईट )

अर्ज कोठे करा.

बालसंगोपन योजनेचा (BALSANGOPAN YOJANA) लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा. तिथे आवश्यक अर्ज भरून, त्यासोबत लागणारी कागदपत्रं जोडून जमा करावी. अर्जाच्या तपासणीनंतर पात्र असणाऱ्या मुलांना योजनेचा लाभ त्यांचा बँक खात्यावर वितरित केला जातो.

1 thought on “अनाथ मुलांना मिळणार 2250 रुपये आर्थिक लाभ. BALSANGOPAN YOJANA”

Leave a comment