bandhkam kamgar scholarship बांधकाम कामगारांच्या मुलांना एवढी मिळते शिष्यवृत्ती.

bandhkam kamgar scholarship महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणी करत असलेल्या कामगारांच्या मुलांना महामंडळाकडून शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप दिली जाते ही स्कॉलरशिप कोणत्या वर्गासाठी किती दिले जाते . ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा. त्यासोबतच कोणती कागदपत्रे आवश्यक लागतात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत.

कोणत्या विद्यार्थी यांना किती मिळते शिष्यवृती.

बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणी करत असलेल्या कामगारांच्या पाल्यांना शासनाकडून म्हणजेच बांधकाम कामगार महामंडळाकडून शिष्यवृत्ती वितरित केली जाते ही शिष्यवृत्ती कोणत्या वर्गासाठी किती दिले जाते याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
  • विद्यार्थी पहिली ते सातवी मध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना 2500 रुपये एवढे शिष्यवृत्ती दिली जाते.
  • विद्यार्थी आठवी ते दहावी या वर्गात असेल तर त्या विद्यार्थ्याला 5 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.
  • विद्यार्थ्याने इयत्ता दहावी किंवा बारावी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळवले असल्यास विद्यार्थ्याला 10 हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित केली जाते.
  • विद्यार्थी अकरावी आणि बारावी या वर्गात शिक्षण घेत असल्यास विद्यार्थ्याला 10 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.
  • विद्यार्थी तसेच बांधकाम कामगाराची पत्नी पदवी शिक्षण घेत असल्यास प्रथम वर्ष द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या शिवसैनिक खर्चासाठी प्रति वर्ष 20 हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित केली जाते.
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यांना व पत्नीस वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.
  • बांधकाम कामगाराच्या पाल्याला तसेच पत्नीला अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी 60,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते.
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शासनमान्य पदवी के करिता प्रतिवर्षी 20 हजार रुपये आणि पदवीत्तर पदविके करिता प्रतिवर्ष 25 हजार रुपये एवढे शिष्यवृत्ती वितरित केली जाते.
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यांना संगणकाचे ज्ञान मिळवण्यासाठी MS- CIT हा कोर्स पूर्ण करण्याकरिता देखील शिष्यवृत्ती वितरित केली जाते.

हे वाचा : बांधकाम कामगार नोंदणी असा करा अर्ज

शिष्यवृत्ती लाभ मिळवण्यासाठी लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड .
  2. मागील वर्षी उपस्थिती प्रमाणपत्र .
  3. चालू वर्षाचे बोनफाईट .
  4. ओळख पत्र .
  5. रेशन कार्ड .
  6. हमी पत्र .
  7. गुणपत्र मार्कशीट .
  8. मागील वर्षी 75 टक्के उपस्थिती प्रमाणपत्र.
  9. MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र (फक्त mscit साठी).
  10. फिस भरलेली पावती.
  11. ज्या घटकाचा लाभ घ्यायचाअसेल त्या घटकांसाठी अन्य कागदपत्रे.

bandhkam kamgar scholarship अर्ज कसा करावा

bandhkam kamgar scholarship बांधकाम कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे

  • अर्ज करण्यासाठी आपल्याला बांधकाम कामगाराच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
  • त्या ठिकाणी क्लेम करा या पर्यावरणाचा अवलंब करावा लागेल
  • त्यानंतर न्यू क्लेम या पर्यावरण क्लिक करावे लागेल
  • आपला नोंदणी क्रमांक भरावा लागेल
  • सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांक एक ओटीपी पाठवण्यात येईल.
  • ओटीपी समोरील बॉक्स मध्ये भरल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर आपल्यासमोर आपली सर्व वैयक्तिक माहिती व फॉर्म ओपन होईल.
  • या फॉर्ममध्ये खाली क्लेम या पर्यायांमध्ये शैक्षणिक क्लेम हा घटक निवडावा लागेल.
  • त्यानंतर आपण कोणत्या घटकांतर्गत अर्ज करत आहात ते निवडून घ्यावे लागेल.
  • घटक निवडल्यानंतर विद्यार्थ्याचे म्हणजेच पाल्याचे नाव निवडावे लागेल.
  • त्यानंतर पाल्य शिक्षण घेत असलेल्या घटकांची माहिती ज्यामध्ये कॉलेजचे नाव कॉलेजचा पत्ता तसेच ई-मेल आयडी मोबाईल नंबर भरून घ्यावा लागेल.
  • ऍडमिशन तारीख भरून घ्यावी लागेल.
  • खाली आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट तपासणीसाठी तारीख निवडावी लागेल.
  • शेवटी आपला अर्ज सादर करा या पर्यावरण क्लिक करावे लागेल.

या पद्धतीने आपण आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता आपला अर्ज सादर झाल्यानंतर आपल्याला मिळणारे प्रिंट सेव करून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा ज्या तारखेला आपले डॉक्युमेंट वेरिफिकेशन होणार आहे त्या तारखेला आपल्या जवळील इमारत बांधकाम कल्याणकारी महामंडळ येथील कार्यालयात जाऊन आपले कागदपत्रे तपासणी करावे लागतील. कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल.bandhkam kamgar scholarship

Leave a comment