Bank Aadhar Link : कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ हा थेट बँक खात्यात जमा केला जातो. पण मात्र, या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा असे होती की, नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे माहिती नसते. अनेक शेतकऱ्यांची अशी समस्या आहे.

त्यामुळे त्या शेतकऱ्यांना सरकारी अनुदान, पीएम किसान, उज्वला योजना, शिष्यवृत्ती, पेन्शन किंवा इतर योजनेचे पैसे बँक खातात जमा होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी हे माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे की, आपले आधार कोणत्या बँकेची (Bank Aadhar Link) लिंक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी आपण आज या लेखांमध्ये पाहूया आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे हे कसे पाहिजे. Bank Aadhar Link
हे वाचा : 1 एप्रिल पासून बदलणार नवीन नियम; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम.
असे तपासा ,तुमचा आधार नंबर कोणत्या बँकेचे लिंक आहे?
- तुम्हाला तुमचा आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे हे तपासण्यासाठी सर्वप्रथम https://www.npci.org.in/ या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
- ही वेबसाईट ओपन केल्यानंतर Consumer हा पर्याय निवडा.
- हा पर्याय निवडून घेतल्यानंतर Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) या पर्याय वर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर डाव्या साईडला एका कोपऱ्यात तीन रेषांचा मेन्यू असेल, त्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर Aadhaar Mapped Status हा पर्याय दिसेल.
- Aadhaar Mapped Status हा पर्याय निवडून घ्यायचा . निवडून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक तीन बॉक्स मध्ये टाकून घ्यावा लागेल
- त्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या सुरक्षा कॅप्चा कोड टाकून घ्यावा लागेल .
- कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी (OTP)येईल.
- तो ओटीपी टाकून सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसेल .
- या माहितीमध्ये तुम्हाला आधार क्रमांक,मॅपिंग स्टेटस, आणि शेवटी आधार नंबर ज्या बँकेशी लिंक आहे, त्या बँकेचे नाव दिसेल .
- अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आधार नंबर ज्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेचे नाव पाहू शकतात .
- काही काही वेळा असे होते की,काही वापर करताना बँकेचे तपशील दिसत नाही.अशावेळी त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्याचा पर्याय आहे .
- तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन, तुम्हाला तुमच्या आधार मोबाईल सह खाते उघडता येते .
- खाते उघडल्यानंतर ते आपोआप आधार नंबर लिंक होते आणि तुम्हाला एक कार्डही .दिले जाते .
याचे फायदे
या सर्व प्रक्रियेमुळे,येणारा लाभ हा थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यातच जमा होऊ शकतो कोणत्याही दलालाची किंवा मध्यस्थी टाळून, थेट लाभ खात्यात मिळू शकतो . विशेषता ही प्रक्रिया ग्रामीण भागातील शेतकरी,महिला वर्ग,वृद्ध आणि शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी. ही माहिती खूप महत्त्वाची आहे .Bank Aadhar Link
शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी
शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी,तुमचा आधार क्रमांक कोणत्या बँकेचे लिंक आहे, हीच माहिती वेळेवर तपासली जावी .त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे वेळेवर बँक खात्यात जमा होतील आणि कुठेही धावपळ करण्याची गरज पडणार नाही Bank Aadhar Link