best Cow verity  :दूध व्यवसाय करत आहात का? तर तुम्ही या जातीच्या गायीचे संगोपन करा आणि 100 लीटर पर्यंत दुधाचे उत्पन्न मिळवा!

best Cow verity : भारतात शेती आणि त्याच्याशी संबंधित व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन नसून चांगल्या कमाईचे मार्ग आहेत. पन मात्र, अनेकदा शेती आणि पशुपालनाला कमी लेखले जाते. तरीही अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करून चांगला नफा कमावत आहेत . तर आज आपण आशाचं रशियातून उच्च शिक्षण पूर्ण तरुणाची यशोगात पाहणार आहोत.

ग्रामीण भागातील अनेकजण गाय, म्हैस, बकरी, मेंढी यांसारख्या प्राण्यांचे संगोपन करून दुग्ध व्यवसायात चांगले यशस्वी झाले आहेत. जर तुम्हालाही गाय पालन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर संतोष सिंग यांचा आदर्श तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरू शकतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

संतोष सिंग यांचा यशस्वी प्रवास

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील संतोष सिंग गेल्या २५ वर्षांपासून गाय पालन व्यवसाय करत आहेत. रशियातून उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी गावी येऊन दूध व्यवसायाला सुरुवात केली.संतोष सिंग यांनी गाय पालन व्यवसायातून आतापर्यंत लाखों रुपयांची कमाई केली आहे. दुग्धोत्पादनासाठी त्यांनी अनेक जातींच्या गायी पाळल्या आहेत. आज त्यांच्याकडे गीर, साहिवाल, जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजियन जातींच्या २० पेक्षा जास्त गायी आहेत.संतोष सिंग यांनी असे सांगितले की या चार प्रजातींपैकी फ्रिजियन गाय सर्वाधिक दूध देते. या फ्रिजियन गायींच्या उत्कृष्ट दुग्धोत्पादन क्षमतेमुळे त्यांना रोज १०० लिटरहून अधिक दूध मिळते. हे दूध डेअरीला विकून संतोष सिंग रोज ३,००० रुपये आणि महिन्याला १ लाख रुपयांहून अधिक कमाई करतात.

हे वाचा: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरच्या हप्त्या बाबत मोठी अपडेट

best Cow verity कशा जातींची निवड करावी?

best Cow verity दुग्ध व्यवसाय सुरू करताना योग्य जातीच्या गायींची निवड करणे महत्त्वाचे आहे. संतोष सिंग यांनी गीर, साहिवाल, जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजियन या गायींचे संगोपन केले आहे. पन यापैकी होल्स्टीन फ्रिजियन गाय सर्वाधिक दूध उत्पादन देते.

गाय पालनाचा व्यवसाय कसा फायदेशीर ठरतो?

  1. दुध उत्पादनात वाढ: उच्च दूध देणाऱ्या जातींची निवड (best Cow verity) करून दुध उत्पादन वाढवता येते.
  2. नियमित उत्पन्न: दररोजचे दूध विक्री उत्पन्नात सातत्य ठेवते.
  3. कमी भांडवलात सुरुवात: पशुपालनासाठी तुलनेने कमी भांडवलाची गरज भासते.

उच्च शिक्षणाचा व्यवसायात उपयोग

best Cow verity संतोष सिंग यांनी व्यवसायासाठी आपले शिक्षण आणि कौशल्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग केला. गायींचे आरोग्य, योग्य आहार, वंध्यत्व निवारण, आणि उत्पादन सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला आहे . जर तुम्हालाही गाय पालन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर उच्च दूध उत्पादन देणाऱ्या जाती निवडून व्यवसाय सुरू करा. योग्य काळजी आणि व्यवस्थापन केल्यास तुम्हालाही मोठे यश मिळवता येईल .

Leave a comment

Close Visit Batmya360