बीज भांडवल योजना bij bhandwal yojana in marathi
आपण आज या लेखामध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या एका योजनेविषयी माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे बीज भांडवल योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आज आपण राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. हे कर्ज राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी कमी व्याज दारात दिली जाते.
Table of Contents
Toggleराज्यामध्ये आपण बघतच आहोत की असे बरेचसे तरुण आहेत की जे सुशिक्षित आहेत पण त्यांना आजही शिक्षणाानुसार नोकरी नाही. त्यामुळे अशा तरुणांना छोट्याशा नोकरीवर अवलंबून न राहतात. स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यात यावा यासाठी राज्यामधील तरुण/तरुणींना राज्य सरकारने हा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे आवश्यक आहे या उद्देशाने राज्यांमध्ये बीज भांडवल योजना सुरू करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी 50 हजार ते 5 लाखापर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणारा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते हे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्जपुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात येते.
राज्य सरकारने बीज भांडवल या योजनेची सुरुवात राज्यातील बेरोजगार तरुण/तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मदत म्हणून सुरू केलेली योजना आहे. बेरोजगार व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन उद्योग किंवा कृषी क्षेत्रात नवीन उद्यम सुरू करू शकतात. ही एक सरकारी योना आहे.
योजनेचे नाव | बीज भांडवल योजना |
योजनेचे उद्देश | एखादा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे. |
योजनेचे लाभार्थी | राज्यामधील सुशिक्षित पण बेरोजगार तरुण व तरुणी |
लाभ | 95 टक्के कर्ज |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन /ऑफलाइन |
बीज भांडवल योजनेची उद्दिष्टे
- राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी या योजना अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- अनुसूचित जमातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर ,होलार ,मोची इत्यादी) या व्यक्तींना त्यांचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारी कमी करणे. आणि एक रोजगाराची संधी निर्माण करणे.
बीज भांडवल योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत लघु उद्योग सुरू करण्यासाठी दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
बीज भांडवल योयोजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप
- या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते हे कर्ज 50 हजार ते 5 लाखापर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत हे कर्ज सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात येते
- 1.50 हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज पुरवठा द.सा. द.शे.9.5 ते 12.5 टक्के व्याजदराने बँकेमार्फत करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीने स्वतः चा सहभाग म्हणून 5 टक्के रक्कम बँकेकडे जमा करायचे असते. आणि बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रकमेपैकी 75 टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते व उर्वरित 20 टक्के रक्कम ही महामंडळ वीज कर्ज योजना म्हणून देण्यात येते. आणि त्या रकमेपैकी एक हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येते व उर्वरित रक्कम ही 4 टक्के व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यात येते.
बीज भांडवल योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड
- बीज भांडवल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 मासिक हप्त्यात एकाच वेळी करायची असते.
बीज भांडवल योजनेची लाभार्थी.
- या योजनेचे लाभार्थी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्ती
बीज भांडवल योजनेचा फायदा
- या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज मिळते. कर्जाची रक्कम आणि व्याजदर तुमच्या प्रकल्पाच्या स्वरूपात आणि तुम्ही कोणत्या वर्गातून अर्ज करत आहात यावर अवलंबून असते.
- या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त फायदा हा अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय (OBC) यांना कर्जावर व्याजदर सवलत मिळते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला व्यवसाय कसा यशस्वीरित्या चालवायचा याबद्दल पण प्रशिक्षण दिले जाते.
बीज भांडवल योजना पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असायला हवा
बीज भांडवल योजना अटी व नियम
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याबाहेर असणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती जमाती चर्मकार समाजाचा असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा किमान महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे शिक्षण कमीत कमी 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत पात्र असण्यासाठी अर्जदार व्यक्तीची वय 18 वर्षे ते 50 वर्ष दरम्यान असावे.
- या योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्तीने जो व्यवसाय निवडलेला असेल त्या व्यवसायाबद्दल त्या व्यक्तीला ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
- या योजनेत पात्र असण्यासाठी अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपये आणि शहरी भागासाठी 1.2 लाखापर्यंत असावे.
- अर्जदार व्यक्तीने या अगोदर महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांकडून लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेत पात्र असण्यासाठी महामंडळाने दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
- या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्याला महाराष्ट्र राज्य बाहेर स्वतःचा उद्योग सुरू करण्यात येणार नाही.
- या योजनेसाठी कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकेल
बीज भांडवल योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- रहिवाशी प्रमाणपत्र
- ई-मेल आयडी
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचा दाखला
- अर्जदार व्यक्तीचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले असलेल्या प्रमाणपत्राची प्रत
- अर्जदार व्यक्ती ज्या जागेवर व्यवसाय करणार आहे त्या जागेचे भाडे पावती, करार पत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा.
- अर्जदार व्यक्तीला व्यवसायाचा अनुभव असलेला पुरावा
- (अवश्य असल्यास) अपंग तत्वाचा दाखला
- प्रतिज्ञापत्र
- उत्पन्नाचा दाखला
- व्यवसायासाठी लागणारे कागदपत्रे:, मालाचे किमती पत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा, गुमास्ता लायसन्स, व्यवसायानुरूप इतर कागदपत्रे वाहनाकरिता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी.
अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
- विहित नमुन्यातील अर्ज भरून संपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे
- अशा प्रकारे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.