वृद्ध कलाकार मानधन योजना kalakar mandhan yojana
आपण आज या लेखामध्ये वृद्ध कलाकार मानधन योजना kalakar mandhan yojana याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्या महाराष्ट्र राज्यातील साहित्य व कला क्षेत्रात आयुष्य विंचलेल्या वृद्ध कलाकार यांचे आर्थिक परिस्थितीमुळे हाल होऊ नये म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जे वृद्ध कलाकार आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे कुटुंब या मानधन जीवनामधल्या लागणाऱ्या रोजच्या वस्तू भागवण्यास मदत होईल. तसेच या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना प्रति महिना 3,150 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
Table of Contents
Toggleकलाकार हे आपल्या तरुण वयात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कलांची कामगिरी गाजवत असतात आणि राज्यातील नागरिकांची मनोरंजन करत असतात पण जेव्हा त्यांची वय होते त्यावेळेस त्यांना हे काम करणे शक्य होत नाही.ज्या वेळेस त्यांना काम करणे शक्य होत नाही त्यावेळेस मात्र अशा वृद्ध कलाकारांना रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो .
वृद्ध कलाकाराच्या अशा समस्येचा विचार करून राज्य शासनाने वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजना या राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारने 7 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जवळपास 56 हजार कलावंतांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी जाहीर केला .
योजनेचे नाव | वृद्ध कलाकार मानधन योजना kalakar mandhan yojana |
योजनेचे उद्देश | वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | राज्यातील वृद्ध कलाकार |
लाभ | 3,150 रुपये प्रति महिना. |
कोणा द्वारे सुरू करण्यात आले | राज्य सरकार द्वारे |
कधी सुरू करण्यात आली | 7 फेब्रुवारी 2014 रोजी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ |
वृद्ध कलाकार मानधन योजना
- कलाकारांना वाढत्या वयामध्ये कोणत्याही प्रकारचा भविष्य निधी नसल्यामुळे वृद्धपकाळात आर्थिक समस्येचा सामना करण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने राज्य सरकारने वृद्ध कलाकार मानधन योजना ची सुरुवात केली.
- वृद्ध कलाकारांना रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये अशा उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- तसेच कला क्षेत्राला प्रोत्साहन देणे.
वृद्ध कलाकार मानधन योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत विधवा तसेच परितक्त्या वृद्ध महिला कलाकारांना मानधन देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी जी रक्कम लाभार्थी कलाकाराच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येईल.
- ही योजना एक वृद्ध कलाकारांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
- या योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध कलाकारांना लागू आहे.
वृद्ध कलाकार मानधन योजनेअंतर्गत दिले जाणारे मानधन
वर्गवारी | मानधन दर महिना | मानधन दरवर्षी |
अ वर्ग | 3,150 रुपये | 37,800 रुपये |
ब वर्ग | 2,700 रुपये | 32,400 रुपये |
क वर्ग | 2,250 रुपये | 27,000 रुपये |
वृद्ध कलाकार मानधन योजनेमध्ये समाविष्ट कलाकार
- भजनी
- किर्तनी
- गोंधळी
- आराधी
- तमाशा
- साहित्यिक
- गायक
- वादक
- विधवा
- महिला
- लेखक
- कवी
- दिव्यांग कलाकार
वृद्ध कलाकार मानधन योजनेचे लाभार्थी
- 50 वर्षावरील महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकार
वृद्ध कलाकार मानधन योजनेचा फायदा
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकारांना प्रत्येकी महिन्याला आर्थिक मदत केली जाणार आहे.
- वृद्ध कलाकारांची वृद्धकाळात कोणत्याही प्रकारची हेळसांड होणार नाही
- वृद्ध कलाकारांचा आर्थिक दृष्टीने विकास होईल तसेच त्यांचे जीवनमान सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
- या योजनेअंतर्गत वाढत्या वयामध्ये रोजच्या दैनंदिन खर्चासाठी वृद्ध कलाकारांना कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
वृद्ध कलाकार मानधन आवश्यक पात्रता
- अर्जदार व्यक्ती किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील कलाकारांना दिला जाईल.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील कलाकारांना दिला जाणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कलाकाराने किमान 15 ते 20 वर्ष काम केलेले असले पाहिजे.
- या योजनेचा लाभ 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कलाकारांना दिला जाईल.
- क्षयरोग ,कुष्ठरोग ,अर्धांग वायू ,कर्करोग ,या रोगांनी आजारी असलेल्या तसेच 40% पेक्षा जास्त शारीरिक व्यंग किंवा अपघातात 40% पेक्षा जास्त अपंगतत्वामुळे स्वतःचा व्यवसाय करू शकत नसलेल्या साहित्यिक व कलाकारांना वयाची अट राहणार नाही.
- दरवर्षी मानधनाची रक्कम अदा करण्यापूर्वी संबंधित मान्यवर हयात असल्याबद्दलचा दाखला त्यांच्याकडून उपलब्ध करून घेणे आवश्यक राहील.
- या योजनेअंतर्गत अर्जदार कलाकाराची वार्षिक उत्पन्न 48,000 रुपये पेक्षा जास्त असू नये.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी अर्जामध्ये ज्या कला क्षेत्रांचा उल्लेख केलेला आहे त्या कलाक्षेत्रासंबंधीत आवश्यक पुरावे, रेडिओ आकाशवाणी प्रसार माध्यमावरील कार्यक्रमाची माहिती व त्याबाबतचे छायाचित्रे, वर्तमानपत्रे कातरणी व कला सादरीकरणाचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
वृद्ध कलाकार मानधनयोजना आवश्यक लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- कलाकार मानधन योजनेचा अर्ज
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा दाखला
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र(आवश्यक असल्यास)
- कलाकार म्हणून कमीत कमी 15 ते 20 वर्ष काम करत असलेला पुरावा.
- बँक खात्याचा तपशील
वृद्ध कलाकार मानधन योजना अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर नवीन युजर या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये विचारलेली माहिती भरून स्वतःची नोंदणी करा
- अशाप्रकारे तुमची नाव नोंदणी पूर्ण होईल.
- त्यानंतर अर्जदाराला होम पेजवर सर्च बॉक्समध्ये वृद्ध कलावंत मानधन योजना टाकून सर्च करावी लागेल.
- आता तुमच्या समोर या योजनेची माहिती दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लागू करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरून अवश्य ते लागणारे कागदपत्रे अपलोड करून घ्यावी लागेल आणि सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.
वृद्ध कलाकार मानधन योजना विचारले जाणारे प्रश्न
- वृद्ध कलाकार योजनेअंतर्गत किती मानधन दिली जाते?
- वृद्ध कलाकार योजनेअंतर्गत 3,150 रुपये इतकी मानधन दिली जाते.
- वृद्ध कलाकार या योजनेचे उद्देश काय आहेत?
- वृद्ध कलाकार या योजनेचे उद्देश असे आहेत की वृद्ध कलाकाराच्या वाढत्या वयामध्ये वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत करणे.
- वृद्ध कलाकार या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली.
- वृद्ध कलाकार या योजनेची सुरुवात 7 फेब्रुवारी 2014 रोजी सुरू करण्यात आली.
- वृद्ध कलाकार या योजनेचा लाभ कोणाला दिला जाईल?
- वृद्ध कलाकार योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व वृद्ध कलाकारांना दिला जाईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.