Borewell anudan : भारत देशाची प्रामुख्याने अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यामुळे सरकार शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी व शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांसाठी अनुदान वितरित करतं. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विकास व स्वतःचा आर्थिक विकास घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. अशीच एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बोरवेल अनुदान (Borewell anudan) योजना याविषयी माहिती घेऊयात.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना शेतीमध्ये आपले उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना बोरवेल खोदण्यासाठी 80% पर्यंत अनुदान वितरित केलं जातं. ही रक्कम जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत मिळू शकते.

बोरवेल अनुदान (Borewell anudan) मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया कागदपत्रे आणि पात्रता याबाबतची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बोरवेल योजनेसोबतच शेतकऱ्यांना आणखी बऱ्याच योजनांचा लाभ वितरित केला जातो. ज्यामध्ये नवीन विहीर खोदणे, शेततळे, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पीव्हीसी पाईपलाईन, जुन्या विहिरीची दुरुस्ती करणे. यासारख्या घटकांचा लाभ शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत दिला जातो. Borewell anudan
हे वाचा : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
शेतकरी पात्रता
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना (Borewell anudan) लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- अर्जदाराकडे अनुसूचित जाती जमातीचा जातीचा दाखला असावा.
- अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा कमी असावे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर एवढी शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे नावे सातबारा आठ अ असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- सातबारा
- आठ अ उतारा
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसील कार्यालयाने जारी केलेले)
- प्रतिज्ञापत्र
- एक एकर जमीन असल्याबाबतचा तलाठी यांचा दाखला.
- कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी शिफारस पत्र.
- गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
- ज्या जागेवर योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या जागेचा फोटो
- ग्रामसभेचा ठरा
वरील दिलेली कागदपत्रे अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या मदतीने आपण अर्ज सादर करू शकता.
अर्ज कसा करावा
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर भेट द्यावी लागेल. या पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर शेतकरी योजना विभाग निवडावा लागेल. शेतकरी योजना विभागामध्ये आपल्याला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हा उपघटक निवडावा लागेल. यामध्ये आपल्याला वरील दिलेल्या सर्व घटकांची माहिती दिसेल. त्यापैकी आपल्याला ज्यामध्ये अर्ज करायचा आहे तो घटक निवडून आपली सर्व माहिती भरून. आपला अर्ज सादर करू शकता.
अर्ज करण्यासंबंधी काही अडचण उद्भवत असल्यास आपल्या कृषी सहाय्यक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधून त्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर आपल्याला त्याची पूर्वसंमती दिली जाते पूर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकऱ्याने ज्या घटकासाठी अर्ज केला आहे त्या घटकाचे काम सुरू करावे. Borewell anudan