Budget 2025 शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय मिळालं ? पहा सविस्तर

Budget 2025 : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget 2025) सादर करण्यात आले. नवीन सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्प (Budget) काल (10 मार्च) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Finance minister and deputy chief minister Ajit pawar) यांनी विधिमंडळात सादर केलं. यामध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळालंते ते आज आपण पाहू या .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात (Budget 2025) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,100 रुपये वाढीव लाभ ,विज बिल माफ करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Budget 2025

Budget 2025 महायुती सरकारने आश्वासन

प्रचारादरम्यान महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते तसेच ,लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये वाढीव लाभ दिला जाईल असे आश्वासन दिले होते . त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पाकडे (Budget 2025) लक्ष लागले होते. मात्र याबाबत ही कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
या अर्थसंकल्पात (Budget) शेती आणि शेतीपूरक क्षेत्रासाठी काही योजनांची तरतूद करण्यात आली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, सौर ऊर्जा प्रकल्प, गाय युक्त शिवार आदींसाठी तरतूद करण्यात आली आहे .Budget 2025

हे वाचा :महिलांसाठी आणखीन एक योजना; मिळणार दर महिन्याला 2500 रुपये लाभ!

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी 500 कोटी निधी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7 हजार 201गावा मध्ये राबविण्यात येणार आहे . या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपये तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रामध्ये कृषी बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने धोरण आखण्यात येत आहे.शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे तसेच , उत्पादन खर्च कमी करणे, उत्पान क्षमता वाढविणे, दर्जेदार शेतीमालाचे उत्पादन तसेच , शेतकऱ्याच्या शेती मालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे .यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकर्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) वापर करण्यात येणार आहे.
या साठी पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांना 1 लाख एकर क्षेत्राला या सुविधेचा लाभ मिळणार आहे .यासाठी येत्या दोन वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.Budget 2025

सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजूरी

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसिंचन योजनेसाठी 200 मेगावॅट क्षमतेच्या 1 हजार 594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे .
गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जुन 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात येणार आहे .सन 2025-26 या करिता 1 हजार 460 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे .

गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही योजना राज्यामध्ये कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येणार आहे.
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजने साठी 2025-26 मध्ये 6.45 कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी 382 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत .

Budget 2025 नदी जोड प्रकल्पास तत्वत :मान्यता

  • वैजगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वत :मान्यता देण्यात आली आहे .या प्रकल्पाची अंदाजीत किंमत 88 हजार 574 कोटी रुपये असून प्रकल्पाचे लक्ष क्षेत्र तीन लाख 71 हजार 277 हेक्टर आहे .या प्रकल्पाचा फायदा नागपूर, वर्धा,अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा यासह जिल्हा न होणार आहे.
  • दमनगंगा-एकदारे-गोदावरी या नदी जोड प्रकल्पामुळे 3.55 टीएम सी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल.
  • नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्राला यामुळे सिंचनाला लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रुपये आहे .
  • शासनाने महत्त्वकांशी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे .या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे .
  • कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्याच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यातत वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे ,मराठवाड्यातील सुमारे दोन लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल .

जलयुक्त शिवार अभियान 2.0

राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहायच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किमतीची 1 लाख 48 हजार 888 कामे करण्यात येणार आहेत .

निष्कर्ष

या (Budget 2025)अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत घोषण नसल्यानं शेतकऱ्यांची काहीशी निराशा झाली आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, सौर ऊर्जा प्रकल्प आणि सिंचन योजनांच्या माध्यमातून शेतीच्या विकासावर भर दिल्याने कृषी क्षेत्राला दीर्घकालीन लाभ होण्याची शक्यता आहे.Budget 2025

1 thought on “Budget 2025 शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय मिळालं ? पहा सविस्तर”

Leave a comment

Close Visit Batmya360