Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधिमंडळात महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024 सादर केला. या अहवालात लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत जून 2024 ते डिसेंबर 2024 या सात महिन्यांत किती निधीचे वाटप झाले, त्याची माहिती अहवालात मांडण्यात आली आहे. त्या माहितीनुसार या सात महिन्यांच्या कालावधीत 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) निधी देण्यात आला आहे. हा निधी तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा आहे, अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात आर्थिक पाहणी अहवाल मांडला . त्यात ही माहिती देण्यात आली . Ladki Bahin Yojana

लेक लाडकी योजनेत मोठी वाढ
महिला कल्याणासाठी आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी योजना जी राज्य शासनाने सुरु केली आहे. या योजनेतील मदतीत गेल्या एका वर्षात मोठी वाढ झाली आहे.
- 2023 -24 मध्ये केवळ 2,889 लाभार्थींना 7.79 कोटी रुपये वाटप झाले.
- 2024 – 25 मध्ये लाभार्थ्यांची संख्या 1.04 लाखांवर गेली आणि 52 कोटी रुपये वितरित करण्यात आले. Ladki Bahin Yojana
याशिवाय, माझी कन्या भाग्यश्री योजनेतील निधीही वाढवण्यात आला आहे.
- 2023 – 24 मध्ये या योजनेसाठी 6.78 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.
- 2024 – 25 मध्ये हा निधी 13 . 20 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला.
हे वाचा : राज्याच्या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा.
महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभा
राज्यात महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.Ladki Bahin Yojana
- या ग्रामसभांच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी लोकचळवळ उभी करण्याचा उद्देश आहे.
- महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी गावपातळीवर धोरणांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
- तसेच, महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
निष्कर्ष
महाराष्ट्र (Ladki Bahin Yojana) सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुदी केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजना यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी काळात या योजनांचा आणखी विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. तसेच, महिला सुरक्षेसाठी आणि सशक्तीकरणासाठी नवीन निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. Ladki Bahin Yojana
1 thought on “Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना 7 महिन्यांत किती निधीचे वितरण ? विधिमंडळातून आली माहिती समोर”