Caller name presentation: कॉल आल्यावर आता दिसणार आधार कार्ड वरील खरे नाव. वापरकर्त्यांसाठी येणार नवीन फीचर.

Caller name presentation आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि मोबाईल कॉल हे अत्यंत महत्त्वाची गरज झालेली आहे. मोबाईल वापर कर्त्यांना विविध कामासाठी मोबाईलचा उपयोग आवश्यक लागतो. यातच प्रामुख्याने मोबाईलचा वापर फोन कॉल करणे आणि फोन कॉल स्वीकारणे यासाठी देखील महत्त्वाचा आहे. या मोबाईल वापर करण्यासाठी सरकारकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आले आहे. या नवीन नियमावलीनुसार प्रत्येक कॉल करणाऱ्या व्यक्तींचे खरे नाव आपल्यासमोर प्रदर्शित केले जाणार आहे.

याआधी आपण ट्रू कॉलर च्या माध्यमातून नंबर कोणाचा आहे हे ओळख पटवण्याचे काम करत होतो. शासनाच्या नवीन नियमावलीनुसार आता सिम कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे; त्या व्यक्तीचे आधार कार्ड वरील नावच आपल्याला प्रदर्शित केले जाणार आहे.

Caller name presentation

हे वाचा; इलेक्ट्रिक गाड्या टॅक्स फ्री होणार

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

टेलिकॉम कंपन्या ज्यामध्ये जिओ, एअरटेल आणि व्हीआय या वापरकर्त्यांना लवकरच एक सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या कॉल वरील कॉल करणारा व्यक्ति कोण आहे त्याचे आधार कार्ड प्रमाणे प्रदर्शित केले जाणार आहे. याचा उद्देश फोन कॉल वरून होणारी फसवणूक आणि अनावश्यक मार्केटिंग कॉलस वर नियंत्रण मिळवणे.

काय असणार caller name presentation

भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल, व्हीआय या कंपनीच्या माध्यमातून caller name presentation (cnap) फीचर्स लॉन्च केले जाणार आहे. या नवीन येणाऱ्या येणाऱ्या फीचर्स नुसार कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आधार कार्ड नुसार दाखवले जाणार आहे. ज्यामुळे ट्रू कॉलर सारख्या थर्ड पार्टी ॲप ग्राहकांना वापरण्याची आवश्यकता देखील राहणार नाही.

कॉलर नेम प्रेझेंटेशन याची अंमलबजावणी करण्यासाठी एचपी डेल नोकिया यासारख्या मोठ्या कंपन्या आपल्या तंत्रज्ञानाच्या साह्याने यासाठी मदत करणार आहे. या आधीच टेलिकाम रेगुलट्री ॲथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) कडून या सुविधेची शिफारस मागील वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आली होती. TRAI च्या शिफारशीनुसार भारतीय दूरसंचार विभाग (DOT) कडून ऑपरेटर यांना या सुविधेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Kyc कागदपत्रानुसार दिसणार नाव

Caller name presentation कॉलर नेम प्रेझेंटेशन या नवीन फीचर्स नुसार सिम कार्ड वापर करताना केवायसी करताना आपले जे कागदपत्र जमा केले होते त्या कागदपत्रावरील नाव प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्डचा समावेश असणार आहे. या नवीन पिक्चर नुसार प्रत्येक इन्कमिंग कॉल वर ओरिजनल मूळ मालकाचे नाव प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळे येणाऱ्या कॉल च्या माध्यमातून अधिक विश्वास आणि सुरक्षिततेचा अनुभव ग्राहकांना अनुभवायला मिळणार आहे.

या नवीन जोडण्यात येणाऱ्या पिक्चर चे मूळ उद्देश बनावट आणि स्पॅम्प कॉल कमी करणे. ज्या मधून वापर करण्याची फसवणूक होणार नाही. आणि वापर करताना येणाऱ्या कॉल वर अधिक विश्वास प्राप्त करून देणे.

हे पण वाचा:
Devendra Fadnavis अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींकडून भरीव मदतीचे आश्वासनDevendra Fadnavis

Leave a comment