Electric Vehicles मोठी बातमी! राज्यात इलेक्ट्रिक गाड्या टॅक्स फ्री होणार ; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा…!

Electric Vehicles : सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मार्केटमध्ये चांगलीच हवा पाहायला मिळते. सध्या वाढलेले पेट्रोल आणि डिझेलच्या भावापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती महाग असल्याने इच्छा असताना पण ते खरेदी करू शकत नाहीत. आता राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिक गाड्यांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. विधानसभेमध्ये बोलत असताना त्यांनी याबाबतीत माहिती दिली.Electric Vehicles

इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणाची होणारी हनी लक्षात घेऊन. राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील नागरिकांनी, ग्राहकांनी, जास्तीत जास्त इव्ही खरेदी करावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्यात येणार आहे .तसेच,राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील इलेक्ट्रिक वाणी आता करमुक्त करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Electric Vehicles

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गुड न्यूज

शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज दिली आहे . इंधनाचे वाढते दराने पर्यावरणावर होणारे दूषित परिणाम लक्षात घेऊन ईव्ही म्हणजे, इलेक्ट्रिकल व्हेईकल्सल (EV) प्राधान्य दिले जात आहे. ग्राहकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करावी यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनावर सबसिडी देण्यात येत आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) करमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या गाड्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्याही इलेक्ट्रिक असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधिमंडळ सभागृहात पर्यावरणाची संबंधित चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. Electric Vehicles

हे वाचा : एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मिळाली मुदतवाढ! या तारखेपर्यंत करता येणार अर्ज.

30 लाखापर्यंतच्या गाड्यांना टॅक्स फ्री

राज्यातील इलेक्ट्रिक गाड्या (Electric Vehicles) करमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे. आपण इलेक्ट्रिक व्हेईकल लावत नाही .30 लाखापर्यंतच्या वाहनांना टॅक्स नाही, त्यावर 6 टक्के कर लावतोय . त्यामुळे इलेक्ट्रिक वाणावरील टॅक्स मागे घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेत इलेक्ट्रिक सवानी टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली .तसेच,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाची आणि सर्व मंत्र्यांच्या गाड्या इलेक्ट्रिक असतील,अशी ही घोषणा विधान परिषदेत केली.

आमदारांना इलेक्ट्रिक गाड्यांना कर्ज दिले जाईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले शासकीय कार्यालयासाठी शक्य असेल तेवढ्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या घेण्यात येतील, तसेच आमदारांना गाड्या खरेदीसाठी दिले जाणारे कर्ज फक्त हे इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच असेल,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले आहे .

पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडीवर उपाय

पिंपरी चिंचवड मधील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून 2500 ईव्ही BUS घेण्याचा सरकारचा विचार आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात म्हणाले,मेट्रो आणि बसेसच्या माध्यमातून वाहतूक कोंडी व नियंत्रण मिळवण्यात येईल . पिंपरी चिंचवडमध्ये ईव्ही वाहनांची संख्या वाढत आहे आणि टु-व्हिलर सेगमेंटमध्येही ईव्ही (Electric Vehicles) बाईक्सही विकल्या जात आहेत. ई-चार्जिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पुणे आणि छ. संभाजीनगरमध्ये ईव्हीच्या मोठ्या प्रकल्पांची सुरूवात झाली असून , ज्यामुळे ते सिटी कॅपिटल म्हणून विकसित होत आहेत, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली. Electric Vehicles

Leave a comment