namo shetkari 6 hapta ; केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी देशात पीएम किसान सन्मान निधी योजना सन्माननीय योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत पात्र असणारा शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये एवढा निधी वितरित केला जातो. हा निधी वितरित करण्यासाठी प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये या प्रमाणात हप्ते वितरित केले जातात.
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात नमो शेतकरी सन्माननीय योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये वितरित केले जातात. या योजनेचे अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 05 हप्त्यांचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आलेले आहे. मागील वेळी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे एका दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते. पी एम किसान योजनेचे 19 व्या हप्त्याचे पैसे जमा झाले परंतु नमो शेतकरी योजनेचे 6 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली नव्हती.

नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सहावा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. राज्य शासनाने दिनांक 26 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून सहावा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असणारे रक्कम मंजूर केली आहे. शासनाने रक्कम मंजूर केल्यामुळे लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना सहाव्या हफ्त्याचं वितरण केलं जाईल.
कधी मिळेल 6 वा हप्ता namo shetkari 6 hapta
निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा केली जाईल हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. राज्य शासनाने रक्कम मंजूर करून ही रक्कम dbt विभागाला वितरित केली जाईल. रक्कम वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहावा हप्ता जमा केला जाईल. 31 मार्च पूर्वी नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सहावे हप्त्याचं वितरण केले जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
namo shetkari 6 hapta राज्यातील शेतकऱ्यांना 29 मार्चपूर्वी सहाव्या हप्त्याचे वितरण प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. त्यानंतर काही शासकीय सुट्ट्या आल्यामुळे ही रक्कम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देखील वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. अद्याप पर्यंत हफ्ता वितरित करण्याची निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. परंतु शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये कधी पण ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे याआधी आपण पाहिलेले आहे.
रक्कम वितरित होणार डीबीटी अंतर्गतच
राज्य सरकार मंजूर केलेली रक्कम डीबीटी विभागाला वितरित करेल. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी राज्य शासन डीबीटी विभागाला परवानगी देईल. डीबीटी विभागाला परवानगी मिळाल्या नंतर पात्र असणाऱ्या त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर सहाव्या हप्त्याचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. namo shetkari 6 hapta