Captain 200 DI Mini Tractor : शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने कामे करणे सोपे झाले आहे. यामध्ये ट्रॅक्टर तंत्रज्ञानाचा वापर जास्त प्रमाणात ठरतो .सध्याच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करणे शक्य होत नाही. आणि शेती करण्यासाठी मजुरी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात उपलब्ध होणारा हा मिनी ट्रॅक्टर फायदेशीर राहील. पण कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे ट्रॅक्टर घेणे परवडत नाही . याचसाठी मिनी ट्रॅक्टर एक उत्कृष्ट पर्याय ठरतो . कॅप्टन कंपनीचा 200 DI मिनी ट्रॅक्टर कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे
Captain 200 DI Mini Tractor ची वैशिष्ट्ये
कॅप्टन 200 DI मिनी ट्रॅक्टर हे कमी क्षेत्र असणाऱ्या शेती साठी आदर्श आहे. यात 895 सीसी सिंगल सिलेंडर, वॉटर-कुल्ड इंजिन आहे, जे 20 एचपीची शक्ती निर्माण करते. यामुळे ट्रॅक्टरची कार्यक्षमता अधिक होते आणि तो इंधनाची कमी गरज भासवतो. इंजिनचे RPM 2300 असते, ज्यामुळे अनेक शेती उपकरणे सहजपणे वापरता येतात.
हे वाचा : येथे भरा मोफत पीक विमा अर्ज.
Captain 200 DI Mini Tractor शेतीतील सोयीस्कर साथी
हा ट्रॅक्टर 17 एचपी पीटीओ क्षमता देतो, ज्यामुळे कोणतेही शेती उपकरण ट्रॅक्टरद्वारे चालवले जाऊ शकते. या ट्रॅक्टरमध्ये 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर्स आहेत. तसेच, 600 किलो वजनाची वाहतूक क्षमता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतला माल एका वेळी वाहून नेणे शक्य होते.
कमी खर्चात अधिक कार्यक्षम
कॅप्टन 200 DI मिनी ट्रॅक्टरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी इंधन खर्च. कंपनीने यामध्ये मेकॅनिकल तसेच पावर (पर्यायी) स्टेअरिंग दिले आहे, ज्यामुळे खडबडीत जमिनीवरही सहज वापरता येतो.
Captain 200 DI Mini Tractor किंमत आणि वॉरंटी
भारतीय बाजारात कॅप्टन 200 DI मिनी ट्रॅक्टरची किंमत 3.29 ते 3.39 लाखांच्या दरम्यान आहे, जी कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याना परवडणारी आहे. यावर एक वर्षाची वॉरंटी मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासार्हता मिळते.
निष्कर्ष
कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीची कामे करायची असतील, तर कॅप्टन 200 DI मिनी ट्रॅक्टर हा उत्कृष्ट पर्याय आहे. कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि कमी इंधन खर्च यामुळे हा ट्रॅक्टर कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो.