free pik vima application शेती पिकाचे नैसर्गिक आपत्ति पासून संरक्षण व्हावे म्हणून सरकार कडून पीक विमा योजना राबवली जाते. या पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण मिळते. जर काही नैसर्गिक आपत्ति ने शेतकऱ्याचा पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून आर्थिक लाभ दिला जातो. पण बऱ्याच वेळा शेतकरी आपल्या कामामुळे किंवा इतर काही अडचणी मुळे आपला पीक विमा अर्ज भरू शकत नाहीत. त्यांच्या साठी आपल्या कडून एक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला पीक विमा भरायचा आहे त्यांना आपण मोफत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
मोफत पीक विमा अर्ज भरण्यासाठी काय करावे.
ज्या शेतकऱ्यांना आपला अर्ज भरायचा आहे त्यांनी पीक विमा अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती खाली दिलेल्या फॉर्मात मध्ये पाठवणे अवश्यक आहे.
- शेतकऱ्यांचे नाव –
- बँक IFSC कोड –
- बँक खाते क्रमांक –
- जिल्हा –
- तालुका –
- महसूल मंडळ –
- गावाचे नाव –
- मोबाइल क्रमांक –
- जमीन खाते क्रमांक (आठ नंबर) –
पीक तपशील या प्रमाने पाठवा
1) जमीन गट क्रमांक पिकाचे नाव क्षेत्र (हेक्टर मध्ये)
2 ) जमीन गट क्रमांक पिकाचे नाव क्षेत्र (हेक्टर मध्ये)
या प्रमाणे आपल्याला कोणत्या गटात कोणते पीक भरायचे आहे याची माहिती देण्यात यावी.जेवढे गट आहेत तेवढे गट क्रमांक व पिकाचे नाव आणि किती क्षेत्र आहे ते पाठवावे. या मध्ये एका शेतकऱ्याची माहिती एकदाच पाठवावी.
माहिती कोठे पाठवाल free pik vima application
मोफत पीक विमा भरण्यासाठी आपणास आमच्या 9822950959 या व्हॉटअॅप (WhatsApp) क्रमांकावर आपली माहिती पाठवणे अवश्यक आहे. वरील माहिती सोबत आपले बँक पासबूक आणि आधार कार्ड स्पष्ट पाठवणे अवश्यक आहे.
काही महत्वाच्या सूचना
- अर्ज पूर्ण पणे मोफत भरला जाणार आहे.
- अर्ज भरण्यासाठी अवश्यक लागणारे कागदपत्रे पाठवणे अवश्यक आहे(उदा. बँक पाससबुक आणि आधार कार्ड)
- एक मोबाइल क्रमांकावरून फक्त दोनच शेतकऱ्यांचे अर्ज भरले जातील.
- आधार वरील नाव आणि सातबारा नाव जुळत नसेल तर अर्ज भरला जाणार नाही.
- सामायिक क्षेत्र असेल तर आपण सहमति पत्र भरून द्यावे. (अन्यथा आपला अर्ज भरला जाणार नाही)
- कागदपत्रे पाठवल्यानंतर आपली पीक विमा पावती आपल्या मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात येईल.
- कागदपत्रे पाठवल्यानंतर 24 तासात आपली पावती पाठवली जाईल (सर्व्हर चा प्रॉब्लेम असेल तर थोडा उशीर होऊ शकतो)
- अर्जबाबत मिळणाऱ्या माहितीसाठी व्हॉटअॅप ग्रुप मध्ये जॉइन व्हा. तेथून तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल.
5 thoughts on “येथे भरा मोफत पीक विमा अर्ज. free pik vima application”