CBSE Pattern :राज्यात लागू होणार CBSE पॅटर्न ! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

CBSE Pattern : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढ आहे. म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये लवकरच एक महत्त्वाची शैक्षणिक सुधारणा होणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले की, शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना गुणवत्ता-पूर्ण शिक्षणाच्या रूपात होणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

CBSE Patternसीबीएससी पॅटर्नची अंमलबजावणी

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न लागू होईल, असे शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इतर इयत्तांमध्येही हा पॅटर्न (CBSE Pattern) लागू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू होईल आणि संबंधित अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत प्रकाशित केली जातील.अशी माहिती भुसे यांनी दिली .

CBSE Pattern शिक्षकांचे प्रशिक्षण

सीबीएसई (CBSE Pattern) पॅटर्न अंमलात आणण्यासाठी शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांचे प्रशिक्षण घेतले जाईल. यासाठी विशेष कार्यक्रमांची आखणी केली जाणार आहे, जेणेकरून शाळेतील शिक्षक पद्धतशीरपणे विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण देऊ शकतील.

हे वाचा: नवीन गाडी खरेदी साठी सरकार आणणार नवीन नियम.

CBSE Pattern शाळांचा विकास

मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांना बंद न करता, त्यांचा विकास करण्यावर भर दिला. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. काही ठिकाणी शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा शाळांचा पुनर्विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, राज्यातील संस्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या विकासासाठी शिक्षण मंत्री आणि अन्य शालेय शिक्षणाधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारतील. शाळेच्या अडचणींना त्वरित निराकरण करून त्यांचं सुसंगत आणि सक्षम विकास सुनिश्चित केला जाईल.

CBSE Pattern नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी:

शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध पावले उचलली आहेत, ज्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळेल. या धोरणाअंतर्गत सीबीएसई पॅटर्नची अंमलबजावणी ही महत्त्वाची पाऊल आहे, ज्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणाचा स्तर सुधारणार आहे.

राज्यभरातील शाळांमध्ये या नव्या पॅटर्नच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना एका अधिक जागतिक दर्जाचे आणि अभ्यासक्षम शिक्षण मिळण्याचा मार्ग खुला होईल.

Leave a comment

Close Visit Batmya360