CBSE Pattern :राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षण मंत्र्यांची घोषणा

CBSE Pattern : आता राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे . शैक्षणिक वर्ष 2025-26 यावर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागून होणार आहे .सरकारचा यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी या हेतूने हा निर्णय घेण्यात येत आहे.

CBSE Pattern

CBSE Pattern 2025-2026 पासून होणार अमलात

सीबीएसई अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच काही शाळांमध्ये अंमलात आणला जाणार आहे. मात्र, पूर्णतः लागू करण्याची प्रक्रिया 2025-2026 शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा बदल करण्यात येणार आहे.

हे वाचा : आरटीई प्रवेश प्रक्रिया दुसरी यादी प्रसिद्ध.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणविषयक बैठकीत यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. बैठकीत त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पावले उचलावीत असे निर्देश दिले होते. शालेय शिक्षण विभागाने गुणवत्ता सुधारण्यासाठी सीबीएसई (CBSE Pattern) पॅटर्न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी भाषेतच अभ्यासक्रम उपलब्ध

आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेतील प्रश्नाच्या माध्यमातून विचारलेल्या शंकेला उत्तर देताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिले की, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करून देण्यात येतील. 1 एप्रिलपासून नव्या सत्राची सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढीचा प्रयत्न

या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये अधिक व्यापक आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम बनवण्यास हा निर्णय उपयुक्त ठरेल. CBSE Pattern

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Leave a comment