Nuksan Bharpai :अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 कोटीं मदत निधी मंजुरी

Nuksan Bharpai : मागील वर्षी जून ते ऑक्टोंबर 2024 या कालावधीत राज्यातील झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या . या नैसर्गिक आपत्तीमुळे (Nuksan Bharpai) शेती उध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी सरकारकडे मदतीची मागणी होत होती,आणि आता सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे .

Nuksan Bharpai

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 6 कोटी 40 लाख 47 हजार निधी मंजूर

नुकसान (Nuksan Bharpai) ग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा हा शासन निर्णय 18 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे .राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 6 कोटी 40 लाख 47 हजार रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे .

हे वाचा : खरीप पिक विमा बाबत दिली महत्त्वाची माहिती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर?

छत्रपती संभाजीनगर,अमरावती नाशिक आणि पुणे विभागातील 9 हजार 219 शेतकऱ्यांचा समावेश आहे . विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे .Nuksan Bharpai

  • तर छत्रपती संभाजी नगर विभागातील : धाराशिव ,हिंगोली,लातूर या तीन जिल्ह्यातील 985 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 1 कोटी 69 लाख 11 हजार कृपया चा निधी मंजूर करण्यात आला आहे .
  • अमरावती विभागातील : अतिवृष्टी आणि पूरग्रस्त (Nuksan Bharpai) शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर
  • अकोला जिल्ह्यातील 422 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपये
  • यवतमाळ जिल्ह्यातील 1 हजार 48 शेतकऱ्यांना 75 लाख 86 हजार रुपये मंजूर .
  • अमरावती जिल्ह्यातील 65 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन 8 लाख 80 हजार रुपये मंजूर
  • वाशिम जिल्ह्यातील 20 बाधित शेतकऱ्यांना 90 हजार रुपये मंजूर
  • तर बुलढाणा जिल्ह्यातील 6 हजार 411 बाधित शेतकऱ्यांना 3 कोटी 14 लाख 29 हजार रूपया चा निधी मंजूर करण्यात आला आहे .
  • नाशिक विभागासाठी: विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार निधी मंजूर अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 बाधित शेतकऱ्यांना 42 हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे .
  • तर पुणे विभागातील: सातारा जिल्ह्यातील एका बाधित शेतकऱ्याला 90 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .

शेतकऱ्यांना किती हेक्टरच्या मर्यादित नुकसान भरपाई दिली जाणार?

दरम्यान, शासन निर्णयानुसार चारी विभागातील विभागीय आयुक्तांकडून एकूण 9 हजार 299 बाधित शेतकऱ्यांच्या मदतीची प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत . जून ते ऑक्टोंबर 2024 या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकाचे अतिवृष्टी (Nuksan Bharpai) आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं . यामधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यादित मदत देण्यात येणार आहे .

बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार हेक्टरी 47 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे .परंतु यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा शेतकऱ्यांना कमी निधी दिला जातो ,असं शेतकरी सांगतात. त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतात. Nuksan Bharpai

Leave a comment