cotton rate : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेषता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे वर्ष खूप आव्हानात्मक दिसत आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे.
हंगामातील आव्हाने :
cotton rate खरीप हंगामातील यावर्षी सुरुवातीपासूनच कापूस पिकाची लागवड कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले होते त्यातच अवकाळी पावसाने यावर्षी कापसावर मोठे संकट टाकले यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न 50% ने घटले आहे. या परिस्थितीमुळे बाजारात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
नंदुरबार कृषि उत्पन्न बाजार समिती
नंदुरबार कृषि उत्पन्न बाजार समिति मध्ये मध्ये २४ व २५ तारखेला कापसाची ९० क्विंटल पर्यन्त आवक झाली. कमीत कमी ६१०० रुपये तर जास्तीती जास्त ७०४० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सरासरी कापसाला ६७०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणात भाव मिळाला . मात्र, दुसर् या दिवशी कापसाचे दर थोडे घसरून ६९०० रुपये आणि किमान दर ६००० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाले.
सावनेर कृषि उत्पन्न बाजार समिती
सावनेर कृषि उत्पन्न बाजार समिती येथे ४०० क्विंटल आवक पाहायला मिळाली सरासरी ७००० रुपये प्रतिक्विंटल भाव पाहायला मिळाले आहेत. दुसऱ्या दिवशी आवक २५० क्विंटलपर्यंत घसरली, परंतु भाव घसरले नाहीत.
महागाव कृषि उत्पन्न बाजार समिती
महागाव बाजार समितीत कापसाची ५० क्विंटल आवक झाली असून किमान ६ ००० रुपये व कमाल दर ७००० रुपये प्रति क्विंटल आहे. सरासरी ६५०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
पुलगाव बाजार समिती
पुलगाव येथील बाजार पेठेत सध्याचा सर्वाधिक दर आढळून आला असून १९० क्विंटल कापसाची आवक झाली असता जास्तीत जास्त ७५०० रुपये तर कमीत कमी ६९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सरासरी या बाजारपेठेत 7300 रुपये दर पाहायला मिळाला.
cotton rate शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्चाचे आर्थिक संकट
यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
१.वाढता उत्पादन खर्च : बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमतींमुळे उत्पादन खर्च 30 टक्के पर्यत वाढला आहे.
२. नैसर्गिक आपत्ती : या वर्षी खरीप हंगामातील पिकावर अवकाळी पाऊस आणि पिकांची नासाडी हा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
३.कमी उत्पादन : पावसात पिकाचे अर्धे उत्पादन वाया गेल्याने उत्पन्नात अचानक मोठी घट झाली आहे.
4 बाजारातील अस्थिरता : विविध बाजार समित्यांमध्ये दरांमध्ये लक्षणीय फरक असतो.
शेतकऱ्यांना आशा देणाऱ्या घटना.
१. भाववाढ होण्याची शक्यता : उत्पादन कमी झाले आणि अशीच मागणी कायम राहिली तर येत्या काळात कापसाचे दर नक्कीच वाढतील.
2. सरकार करणार मदत : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीला सरकार नक्कीच मदत करेल.
३. नवीन धोरण राबवण्याची गरज : भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विमा संरक्षण व पीक संरक्षण यंत्रणा अधिक चांगली कार्यक्षम बनवावी लागेल.
नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून होणारे नुकसान यामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे कसोटीचे वर्ष ठरले असले, तरी बाजारभावातील तफावत चिंतेची बाब असून, उत्पादन व मागणीतील घट लक्षात घेता येत्या काळात दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. या सर्व घटकाचा बाजारावर परिणाम दिसून येईल आणि पुढील काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल.
हे वाचा: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 113 कोटी रुपये होणार जमा