कधी मिळणार शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचे 5000
महाराष्ट्र सरकारने 2024 -2025 चा अर्थसंकल्प (Budget) 28 जून 2024 रोजी सादर केला या अर्थसंकल्पात महिलांना फायदा होणारे निर्णय घेण्यात आले. यात महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना प्रती महिना 1500 रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आणि त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. तसेच या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
कधी मिळणार शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचे 5000
अर्थसंकल्पात (Budget) घोषणा करून देखील अजून पर्यंत या अनुदान वाटप करण्या बाबत चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. नेमक शासनाकडून कशी मदत दिली जाणार किंवा याच्या नियम अटी काय असणार याचा अजून पर्यंत शेतकऱ्यांना खुलासा मिळालेला नाही.
कधी मिळणार शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचे 5000
किती हेक्टर पर्यंत मिळणार मदत ?
अर्थसंकल्पात घोषणा करतांना प्रती हेक्टर 5000 रुपयांची घोषणा केली. परंतु काही शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की जर शेतकऱ्याकडे एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस पिकाची नोंद असेल तर त्या शेतकऱ्यांना दोन्ही पिकाचे अनुदान मिळणार किंवा फक्त एकाच पिकाचे अनुदान (Grant) मिळणार या बाबत शासनाकडून कसल्याही प्रकारची स्पष्टता करण्यात आलेली नाही.
अनुदान मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे का?
शेतकऱ्यांना कापूस तसेच सोयाबीन साठी प्रती हेक्टर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. परंतु अजून या बाबत कसल्याही प्रकारची कार्यवाही सुरू झालेली नाही. अनुदान मागणी साठी शेतकऱ्यांना अर्ज करावे लागतील किंवा मागील ई पिक पाहणी च्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल का पिक विमा (crop insurance) रेकॉर्ड नुसार शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाईल याची काहीच कल्पना सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही.
कशी दिली जाऊ शकते मदत
कधी मिळणार शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचे 5000
जर शासनाला कोणत्याही प्रकारची नोंदणी किंवा अर्ज घ्यायचे नसतील तर सरकार कडून ई पिक पाहणी अहवालानुसार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करता येऊ शकते किंवा पिक विमा नोंदी च्या आधारे शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाऊ शकते.
लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करायची असल्यास सरकार ला या बाबत कशी मदत मिळणार या बाबतची स्पष्टता देणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा