Crop insurance: या जिल्ह्यांना मिळणार 1760 कोटी रुपये पिक विमा भरपाई.

Crop insurance : राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित करून पिक विमा वाटपाबाबत रस्ता मोकळा केला. शासनाने दिलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा वाटप होणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून पिक विमा कंपनीला निधी मंजूर करून दिला आहे. हा निधी पिक विमा कंपनीच्या खात्यावर जमादेखील करण्यात आला आहे. त्यानुसारच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पिक विमा मिळणार हे पाहणेदेखील महत्वाचे आहे.

जिल्हा निहाय पिक विमा वाटपाची आकडेवारी पाहिल्यानंतर सर्वाधिक पिक विमा (Crop insurance) हा परभणी जिल्ह्याला मंजूर झालेला आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 426 कोटी रुपये पिक विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी 1760 कोटी रुपयांची पिक विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्याला किती पिक विमा वाटप करण्यात येणार आहे याची माहिती घेऊया.

मराठवाड्यातील प्रमुख जिल्हे छत्रपती संभाजी नगर, बीड जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणत्या ट्रिगर अंतर्गत किती भरपाई वाटप करत देणार आहे याची आकडेवारी खाली दिलेली आहे. Crop insurance

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.
Crop insurance

छत्रपती संभाजी नगर जिल्हा

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला 83 कोटी 38 लाख रुपये, पीक कापणी प्रयोग अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला चार कोटी 83 लाख रुपये. या दोन ट्रिगर च्या अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याला एकूण 88 कोटी 21 लाख रुपये पिक विमा भरपाई वितरित केली जाणार आहे.Crop insurance

हे वाचा : पिकाचे नुकसान झालंय अशी करा पिक विमा कंपनीकडे तक्रार..

जालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत 196 कोटी 95 लाख रुपये एवढा पिक विमा वितरित केल्या जाणार आहे. काडीपच्यात भरपाई अंतर्गत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 66 कोटी 44 लाख रुपये एवढे पिक विमा (Crop insurance) भरपाई वितरित केली जाणार आहे. जालना जिल्ह्याला दोन्ही ट्रिगर च्या अंतर्गत एकूण 263 कोटी चाळीस लाख रुपये एवढा पिक विमा वितरित केला जाणार आहे.

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

परभणी जिल्हा

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 101 कोटी 89 लाख एवढा पिक विमा वितरित केला जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत 296 कोटी 88 लाख रुपये एवढा पिक विमा वितरित केला जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील काढणीपश्चात भरपाई अंतर्गत 27 कोटी 77 लाख रुपये एवढी पिक विमा भरपाई वितरित केली जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तिन्ही ट्रिगर अंतर्गत एकूण 426 कोटी 55 लाख रुपये एवढा पिक विम्याचे वाटप केले जाणार आहे.Crop insurance

नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 102 कोटी 62 लाख रुपयांचा पिक विमा वाटप केला जाणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 245 कोटी 59 लाख रुपयांचा पिक विमा नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. या दोन्ही ट्रिगर च्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी 357 कोटी 21 लाख रुपयाचा पिक विमा वाटप केला जाणार आहे.

हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 26 कोटी 68 लाख रुपये एवढा पिक विमा (Crop insurance) वाटप केला जाणार आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 154 कोटी छत्तीस लाख रुपये एवढा पिक विमा वाटप केला जाणार आहे. दोन्ही ट्रिगडचे अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 181 कोटी पाच लाख रुपये एवढा पिक विमा वाटप केला जाणार आहे

हे पण वाचा:
Crop Insurance List Maharashtra : Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

बीड जिल्हा

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या एका ट्रिगर च्या माध्यमातून 212 कोटी 76 लाख रुपये एवढा पिक विमा वाटप केला जाणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये इतर कोणत्याही ट्रिगर चे अंतर्गत पीक विम्याची वाटप मंजूर करण्यात आलेली नाही. Crop insurance

धाराशिव जिल्हा

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 231 कोटी पाच लाख रुपये एवढा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील एका ट्रिगर चे अंतर्गत पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे. Crop insurance

हे पण वाचा:
Pik Vima Pik Vima: पीक विमा मंजूर, पण खात्यात पैसे आले नाहीत; शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत.

Leave a comment