Crop Insurance yojana :1 रुपयात पिक विमा योजना बंद होणार का? योजनेत गैरप्रकार; काय म्हणाले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे?

Crop Insurance yojana : सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांचे नाव कमी होतात की नाही ,लगेच पिक विमा योजनेवरून चांगला वाद पेटला आहे. यावर काय म्हणाले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे? ते पाहूया.

महाराष्ट सरकार ची सध्या राज्यात 1 रुपयात पिक विमा योजना ही अत्यंत संकटात जमा झाली आहे. तसेच ,राज्यात लाडकी बहीण योजना, पालकमंत्री पद , बीड मधील संतोष देशमुख यांची हत्या आणि आता पिक विमा योजनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे.राज्यातिल 1 रुपयांत पीक विमा योजनेत झालेल्या गैरप्रकारांमुळे या योजनेला घरघर लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.राज्यात यावर वाद सुरू असताना, पीक विमा योजनेत बदल करण्यात येण्याची शिफारस करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Crop Insurance yojana

Crop Insurance yojana बीडमध्ये बोगस पीक विमा प्रकरण

बीड जिल्ह्यात पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे , राज्य सरकार आणि कृषी विभाग हाय अलर्टवर आहेत. पीक विम्यातील बोगस प्रकरणांना कंट्रोल करण्यासाठी, कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने या योजनेत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशी नुसार, शेतकऱ्यांना एक रुपयाऐवजी 100 रुपये भरण्याची सुचवण्यात आली आहे. यामुळे पीक विमा योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे,एक रुपयांत पीक विमा योजना बंद होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

हे वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 1124 जागांची भरती

Crop Insurance yojana कृषीमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्य सरकार हे राज्यामध्ये सर्व समावेश पिक विमा योजना राबवत असते. त्यात केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत एक रुपया भरुन सहभागी होता येते. पण या योजनेत बीड जिल्ह्यामध्ये पिक विमा योजने त गैरप्रकार समोर आल्यानंतर या योजनेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सध्या बोगस पिक विमा प्रकरणामुळे राज्यभर अशी चर्चा रंगली आहे की ही योजना बंद होणार का? तर त्यावर राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अशी उत्तर दिले आहे की, या योजनेविषयीचा जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे राज्याचे कृषिमंत्री म्हणाले.

Crop Insurance yojana कडक शिक्षा करा

तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशी मागणी केली आहे की,ज्या गावांमध्ये असे गैरप्रकार झाले आहे त्यांच्यावर कडक शिक्षा करा. तर एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्‍या निदर्शनास आले आहे. माणिकराव कोकाटे यांनी आशी माहिती दिली की ,बीडमधील बोगस प्रकरणांवर कारवाई सुरु आहे आणि काही व्यक्तींवर कारवाईही केली गेली आहे.

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

राजकीय प्रतिक्रिया आणि शेतकऱ्यांची चिंता

Crop Insurance yojana पीक विमा योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा राजकारणातही तापला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बीडमधील गावांतील भ्रष्टाचारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.तर दुसरीकडे, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पीक विमा योजना बंद केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असा इशारा दिला. त्यांच्या मते, जर पीक विमा योजना बंद केली तर विदर्भासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू शकतात. अशी भीती त्यांनी व्यक्त केली .त्यामुळे पिक विमा योजना ही राज्यात अशी सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

निष्कर्ष

राज्यातील पीक विमा योजनेत सुधारणा किंवा बंदी यावर अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पीक विम्यातील बोगसगिरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, योजनेतील फेरबदल किंवा बंदी शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हे पण वाचा:
Crop Insurance List Maharashtra : Crop Insurance List Maharashtra: पीक विमा परतावा यादी जाहीर; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी जमा..!

Leave a comment