बीटेक शिक्षण घेतलेल्या तरुणांनी निवडला दूध व्यवसाय! आज दूध विकून वर्षाला कमवतो 80 लाख रुपयांचे उत्पन्न.Dairy Farming Business

Dairy Farming Business : आजकाल अनेक उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या सोडून शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायाकडे वळत आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नवनवीन संकल्पना यामुळे शेतीला नवे आयाम मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील वरुण चौधरी यांची यशोगाथा हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. बीटेक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या ऐवजी डेअरी व्यवसाय निवडला आणि त्यांना मोठे यश मिळवले आहे आज आप उत्तर प्रदेशातील वरुण चौधरी यांनी निवडलेल्या डेअरी व्यवसाया बद्दल माहिती पाहू या .

Dairy Farming Business

Dairy Farming Business शून्यातून उभारले साम्राज्य

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बेलवा मोती गावातील वरुण चौधरी यांनी 2013 मध्ये दूध व्यवसाय सुरू केला. बीटेक शिक्षण घेऊनही त्यांनी पारंपरिक नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या वरूणने सुरुवातीला मर्यादित गायी-म्हशी घेऊन काम सुरू केले . वरुण यांच्याकडे आज 200 हून अधिक जनावरे आहेत.

हे वाचा : शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वाधार योजनेचा लाभ ,अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

वरुण यांचा गोठा हा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. थारपारकर, साहिवाल आणि जर्सी या गाईंच्या प्रजाती, तसेच मुर्रा म्हशी येथे सांभाळल्या जातात. स्वयंचलित मिल्किंग मशीनमुळे दूध काढण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून दुधाचा दर्जाही उच्च राखला जातो. जनावरांसाठी लागणारा चारा ते स्वतःच्या शेतात पिकवतात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.

Dairy Farming Business उत्पादन आणि उत्पन्नाचा आकडा

वरुण यांचे दूध उत्पादन दर उन्हाळ्यात 700 लिटर आहे , तर हिवाळ्यात 1200 लिटरपर्यंत वाढत आहे . उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे दूध उत्पादक म्हणून देखील त्याला ओळखले जाते व सहा वेळा गोकुळ पुरस्कार त्याला मिळाला आहे. वरुण यांच्या दुधाची विक्री “पराग मिल्क फूड्स” कंपनीला केली जाते . वरुण चौधरी त्यांच्या डेअरी फार्मिंग व्यवसायातून आज साधारणपणे वर्षाला 90 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल दरम्यान आहे.

Dairy Farming Business पुरस्कार आणि मान्यता

उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठ्या दूध उत्पादकांपैकी वरुण चौधरी हे एक आहेत. त्यांच्या कष्टाने आणि नाविन्यपूर्ण विचारांनी त्यांना सहा वेळा गोकुळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

Dairy Farming Business भविष्यासाठी योजना

वरुण चौधरी याची जर भविष्यातील प्लॅनिंग बघितली तर तो हा व्यवसाय आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते फक्त दूध विक्रीपुरते मर्यादित न राहता दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत.जसे की , लोणी, पनीर आणि तूप यांसारख्या पदार्थांची निर्मिती लवकरच सुरू करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

सुशिक्षित तरुणांसाठी प्रेरणा

वरुण चौधरी यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरते. शिक्षण, मेहनत, आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेक तरुणांना शेती आणि दुग्ध व्यवसायात नवी दिशा दाखवली आहे.Dairy Farming Business

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment