dragon fruit farming अभ्यासातून ड्रॅगन फ्रुट पिकात शोधली संधी

dragon fruit farming : आज आपण पुणे जिल्ह्यातील बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील मच्छिंद्र चौधरी यांचा मुलगा ओमकार चौधरी हा संगणक अभियंता आहे. तो एका कंपनीमध्ये काम करत असे , कोरोना काळात सगळ्यात कंपन्यांनी घरी काम करण्याची परवानगी दिली. त्या काळामध्ये ते घरी आले.
गावाकडे आल्यानंतर ओंमका चे वडील मच्छिंद्र चौधरी हे शेतकरी होते.त्यांच्याकडे वडिलोपार्जित 6 एकर शेती आहे. ओमकार चे वडील हे प्रामुख्याने ऊस, भाजीपाल्याचे उत्पादन घेत असत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ओंकार शेतात राहून कार्यालयीन काम करताना शेतातील कामांमध्ये वडिलांना होईल तितके मदत करत असत. ओंकार इंटरनेटवर काम करत असताना ड्रॅगन फ्रुट विषयी समजले. मग त्यांनी लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व माहिती गोळा केली. 2021 मध्ये सांगोला (जि. सोलापूर) येथील ड्रॅगन फ्रुट शेतीला भेट दिली . आणि मिळालेल्या माहितीची तिथून खात्री करून घेतली खात्री करत असताना बाजारपेठही समजून घेतला.

ड्रॅगन फ्रुट ची अशी केली लागवड

ओंकार चौधरी यांनी सांगोला, इंदापूर येथील आणखीन काही ड्रॅगन फूडचे प्लॉट पाहिले हे प्लॉट बघितल्यानंतर मग त्यांचा विश्वास बसला आणि ओंकार यांनी 2021 मध्ये ‘पोल सिस्टिम ‘ नुसार एक एकर मध्ये ड्रॅगन फूड लागवडीचा निर्णय घेतला. मग त्यांनी जमिनीची मशागत करून, 10 बाय 6 फुटाचे बेड तयार केले. मग त्यामध्ये शेणखत, लिंबोळी पेंड, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे मिश्रण मिसळून घेतले. आणि त्यावर ठिबक सिंचनाची सोय केली. मंग 580 पोल उभा केली. एका बोल च्या बाजूने चार रुपये असे सुमारे 2 हजार 320 रोपांची लागवड केली.

ड्रॅगन फ्रुट पाणी, खत, व्यवस्थापन

या पिकाची लागवड झाल्यानंतर 14 महिन्यांनी फळ लागल्यास सुरुवात होते. या पिकाला दर चार दिवसांनी एकदा ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. या पिकाच्या वाढीच्या अवस्थेत टप्प्याटप्प्याने जैविक खतांची आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची ठिबक सिंचना द्वारे दिले जाते. आवश्यक असल्यावर बुरशीनाशकाची आळवणी केली.

हे वाचा : ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना

dragon fruit farming बहर व्यवस्थापन

dragon fruit farming एक बहराचे 45 दिवसाचे चक्र आहे . सर्वसाधारणपणे सात बहरात उत्पादन मिळते . यामध्ये 15 मार्च दरम्यान या झाडाचे पाणी बंद केले जाते. 25 मे रोजी साधारण मॉन्सून येण्याच्या काळामध्ये ढगाळ वातावरणात पुन्हा पाणी सुरू केले जाते. हे पीक ताणल्या मुळे या पिकाला लवकर पाने फुटतात, फळे लवकर लागतात.पालवी फुटून, उत्पादन वेगाने सुरू होते. तसेच या पिकाला कमीत कमी पाच वेळा हंगाम आणि वातावरणानुसार बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी केली जाते. तर सनबर्कपासून वाचवण्यासाठी सिलिकॉन भुकटीची फवारणी केली जाते.

एवढे मिळाली उत्पादन

पहिल्या हंगामामध्ये सर्वसाधारणपणे तीन टन उत्पादन मिळाले होते. दुसऱ्या वर्षी 5 टन उत्पादन मिळाले होते. आणि तिसऱ्या वर्षी साधारण 7 टन उत्पादन मिळाले आहे. एका झाडाला 15 ते 18 फुले लागतात, तर एका फळाचे वजन 450 ग्रॅम होते. त्याला सरासरी 90 रुपये दराने 6 लाख रुपये उत्पादन मिळाले आहे. यामध्ये वर्षाचा खर्च, लागवड, खत, कीटकनाशके, मजुरी आदि 2 लाख रुपये होतो.

ड्रॅगन फ्रुट वजनानुसार असा मिळतो दर

dragon fruit farming फळाचे वजन (ग्रॅम) दर (रुपये प्रति किलो)

  • 100 70 – 80
  • 200 90 – 100
  • 300-400 100 – 110
  • 500-500 130 – 140
  • 700-800 130 – 140
    म्हणजेच एका फळाचे सरासरी वजन 300 ग्रॅम आणि मिळणारा दर हा 80 ते 90 रुपये प्रति किलो.

अशी आहे विक्रीची व्यवस्था

लागवडी अगोदरच ओंकार यांनी बाजारपेठेचा अभ्यास सुरू केलेला होता. त्यात त्यांनी पुणे, मुंबई बाजार समितीसह वेगवेगळे मॉल आणि थेट खरेदी चर्चा केलेली होती. यानुसार आता सुमारे 40% उत्पादन पुणे, मुंबई बाजार समितीमध्ये पाठवले जाते. विविध विविध मॉल्सचे प्रतिनिधी थेट बांधावरून ही खरेदी करत आहे. मॉल्सना ६० टक्के उत्पादन पाठवले जाते. यामुळे सर्व प्रकारच्या फळांना मागणी राहते, असा ओंकार चौधरी यांचा अनुभव आहे.

Leave a comment