E Pik Pahani : या लेखामध्ये ई पीक पाहणी यादी कशी तयार करायची आणि याचे फायदे काय याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद सातबारा उतारा वर ऑनलाइन पद्धतीने करणे होय. शासनाकडून ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो.
ई पीक पाहणी जर पूर्ण झाली नसेल तर शेतकऱ्यांना विविध अडचणी चा सामना करावा लागतो. ज्या मध्ये हमीभावाने पिकाची विक्री असेल किंवा पीक विमा आर्थिक लाभ असेल. या सर्व घटकांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करणे अवश्यक असते.
E Pik Pahani ॲप
ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना ई पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना हे ॲप प्ले स्टोअर वर जाऊन ॲप सर्च करून इन्स्टॉल करायचे आहे आणि या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी आपले नाव, सातबारा उताऱ्यावर असलेले पीक जमिनीचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती या ॲपमध्ये भरून घ्यावी लागेल.
हे वाचा : ड्रॅगन फ्रुट अनुदान किती दिले जाते, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
E Pik Pahani कोणती अट रद्द करण्यात आली
E Pik Pahani सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे जाहीर केले की सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पण या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे . परंतु अन्य सर्व योजनांसाठी ही ई पीक पाहणी नोंद आवश्यक आहे.
ई पीक पाहणी अर्ज करण्याची पद्धत
- सर्वप्रथम शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे आहे.
- शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून घेतल्यानंतर स्वतःचे खाते तयार करून घ्यायचे आहेत.
- त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची या ॲपमध्ये सर्व नोंद करून घ्यायचे आहे.
- पिकाची सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
- ही अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई पीक पाहणी यादी तयार होते आणि शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद होते.
- गावच्या खातेदार माहिती या पर्यायावर क्लिक करून आपल्या गावातील ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्याची यादी पाहू शकता.
- त्या सोबतच ई पीक पाहणी च्या अधिकृत पोर्टल वर देखील आपल्या गावातील ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता.