e pik pahani rule ई -पीक पाहणी करण्यासाठी आली नवीन अट, तर पहा काय आहे अट?

e pik pahani rule राज्यातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीला चालना देण्यासाठी ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. रब्बी हंगामात या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली असून यामुळे पिकांची नोंदणी अधिक सुलभ होणार आहे. राज्यामध्ये रब्बी हंगामासाठी ई- पिक पाहणी साठी डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅप चा उपयोग करण्यात येत आहे. या ॲपच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत.आज आपण या लेखांमध्ये  50 मीटरच्या आत फोटो अनिवार्य, सहाय्यकांची मदत, आणि सातबारा उताऱ्यावरील अचूक नोंदणी यासारखे फायदे जाणून घ्या.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

e pik pahani rule ई-पीक पाहणी म्हणजे काय?

ई-पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांची डिजिटल नोंदणी करण्याची प्रक्रिया. यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या गट क्रमांकाजवळील 50 मीटरच्या आत पिकांचे फोटो काढणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकाची ई – पीक पाहणी करून घ्यावी.

नोंदणी प्रक्रिया कशी करावी?

  1. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या गट क्रमांकाजवळील 50 मीटरच्या आत पिकांचे छायाचित्र घ्यावे.
  2. या छायाचित्रांसह सातबारा उताऱ्यावर पिकांची माहिती नोंदवावी.
  3. नोंदणीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅप चा वापर करावा.
  4. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गावातील सहाय्यकांची मदत मिळेल.

नोंदणी प्रक्रिया:


घटक
विवरण
फोटो काढण्याचा परिसरगट क्रमांकाच्या 50 मीटर आत
नोंदणीसाठी कालावधी1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2024
सहाय्यकांची भूमिकानोंदणीसाठी मदत करणे

e pik pahani rule ई-पीक पाहणीचे फायदे

  1. पारदर्शक शेती व्यवस्थापन:
    ई-पीक पाहणीमुळे पिकांची नोंद अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या माहितीचा डेटा अचूक आणि व्यवस्थित राहील.
  2. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग:
    डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपद्वारे पिकांच्या नोंदी तयार केल्या जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयी सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल.
  3. फोटो काढण्याच्या नियमांत सुधारणा:
    यापूर्वी गट क्रमांकाच्या मध्यबिंदूपासून फोटो काढण्याचा नियम होता, परंतु आता तो बदलून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पिकांच्या नोंदीत अचूकता येईल.
  4. सातबारा उताऱ्यावर अचूक नोंदणी:
    ई-पीक पाहणीमुळे पिकांची माहिती थेट सातबारा उताऱ्यावर नोंदवली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे हाताळण्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील.

सहाय्यकांची भूमिका

e pik pahani rule शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नोंदणी प्रक्रियेसाठी मदत मिळावी म्हणून प्रत्येक गावागावांमध्ये सहाय्यक नेमले जात आहेत, जेने करून तो सहाय्यक शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करतील. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी कोणतीही अडचण आल्यास हे सहाय्यक त्वरित मदत करतील.

50 मीटर आतच फोटो काढणे आवश्यक आहे

या अगोदर ई – पीक पाहणी करण्यासाठी शेती गटाच्या मध्यबिंदूपासून फोटो काढण्याचा नियम होता. परंतु आता या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना सीमेपासून 50 मीटर आत फोटो घेणे बंधनकारक आहे. या फोटोमुळे पिकांच्या 100% छायाचित्राची पूर्तता होईल, असा नियम करण्यात आला आहे. या नियमाचे पालन करावे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

e pik pahani rule ई-पीक पाहणी ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया असून शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त आहे. या प्रक्रियेमुळे शेती अधिक पारदर्शक होणार असून सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत नोंदणी पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना सर्व योजनांचा लाभ वेळेवर मिळेल.

e pik pahani rule शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे:
नोंदणीसाठी 15 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. यासाठी सहाय्यकांची मदत घ्यावी आणि नोंदणी वेळेत पूर्ण करावी. डिजिटल शेतीच्या दिशेने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांसाठी एक मोठा बदल ठरेल.

1 thought on “e pik pahani rule ई -पीक पाहणी करण्यासाठी आली नवीन अट, तर पहा काय आहे अट?”

Leave a comment