E samrudhi portal नोंदणी
E samrudhi portal : राज्यातील शेतकऱ्यांना आपले पीक हमीभावाने विकण्याकरिता शासनाकडून नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले यामध्ये खरीप 2024 साठी शासनाकडून सोयाबीन उडीद मका मुग अशा प्रकारचे पिके खरेदी केले जाणार आहेत याकरिता शेतकऱ्यांना पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी कशी करायची याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहुयात
E samrudhi portal: शेतकऱ्यांच्या फायद्याची नोंदणी
शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते या आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारकडून हमीभावाने शेतमालाची खरेदी केली जाते त्याकरिता शेतकऱ्यांना ही समृद्धी पोर्टल यावरती नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी शेतकरी आपल्या मोबाईलवरून अगदी काही मिनिटांमध्ये करू शकतात.
E samrudhi porta पोर्टलवर नोंदणी करण्याचे फायदे
शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली तर त्या शेतकऱ्यांना आपले पीक विक्रीच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही तसेच या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची केलेली विक्री व मिळणारे पैसे याबद्दलची सर्व माहिती या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येते.
अशी करा ही समृद्धी पोर्टलवर नोंदणी
आपल्या शेतमालाची हमीभावाने विक्री करण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे फायद्याचे ठरते ही नोंदणी करण्याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
सोयाबीन व उडीद हमीभावाने खरेदी होणार
पोर्टल मराठी मध्ये सुद्धा उपलब्ध
या पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता भाषा पर्यायांमधून मराठी हा पर्याय निवडता येईल ज्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना सर्व माहिती आपल्या भाषेमध्ये उपलब्ध होईल.
E samrudhi portal नोंदणी करण्याची पद्धत
नोंदणीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना https://esamridhi.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल या संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून शेतकऱ्याचा स्वतःचा मोबाईल नंबर व या समोर दिसत असलेला कॅप्चर कोड भरून घ्यावा लागेल त्यानंतर त्या ठिकाणी नियम व अटी या पर्यायाच्या चौकटीत टिक करावी लागेल ही टिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी या पर्यावरण क्लिक करून आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यावा लागेल.
शेतकरी तपशील भरा
ओटीपी भरल्यानंतर शेतकऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आपल्या राज्य आपला जिल्हा आपला तालुका तसेच आपले गाव या सर्व घटकांची व्यवस्थित माहिती भरावी लागेल लक्षात ठेवा आधार वरील जसे नाव आहे त्याच प्रमाणात नाव या ठिकाणी आपल्याला भरावे लागणार आहे.
पिक माहिती तपशील
यामध्ये आपल्याला ज्या पिकांची हमीभावाने विक्री करायची आहे त्या पिकांची निवड करावी लागणार आहे यामध्ये आपण सध्या उपलब्ध असणारे पीक निवडू शकता तसेच भविष्यात आपल्याला या पिकामध्ये बदल देखील करता येणार आहे.
शेतकरी वैयक्तिक तपशील भरा
शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचे आधार वरील नाव आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर लिंग जन्मतारीख पत्ता या सर्व घटकांची माहिती या टॅब मध्ये भरणे आवश्यक आहे.
जमीन तपशील भरा
शेतकऱ्यांना यामध्ये नोंदणी करताना आपल्या शेतीसंबंधी माहिती जोडणे आवश्यक आहे ज्यामध्ये शेतकऱ्याचे खाते क्रमांक गट क्रमांक या बाबी समाविष्ट करणे गरजेचे आहे त्यासोबतच शेतकऱ्याला आपले जेवढे गट असतील त्या सर्व गटांची माहिती या ठिकाणी भरावी लागेल व आपली सातबारा किंवा आठ यापैकी एक डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे.
बँक खात्याचा तपशील भरा
E samrudhi portal नोंदणी करताना शेतकऱ्यांना आपल्या डीबीटी अंतर्गत लिंक असणाऱ्या खात्याचे तपशील देणे आवश्यक आहे यामध्ये खातेदाराचे म्हणजेच शेतकऱ्याचे नाव बँकेचे नाव बँकेचे आयएफएससी कोड तसेच खाते क्रमांक या गोष्टींची माहिती भरणे गरजेचे आहे.
स्कीम निवडणे माहिती
E samrudhi portal वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला स्कीम निवडावे लागणार आहे. यामध्ये ज्या किमान अंतर्गत खरेदी नोंदणी चालू आहे ती स्कीम या ठिकाणी निवडावी लागेल. जसे की उन्हाळी हंगा खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम ही स्कीम निवडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपले कोणते पीक विक्रीसाठी न्यायचे आहे त्याचे तपशील भरावे लागणार आहे. व अंदाजे आपले पीक किती आहे याचाही तपशील या ठिकाणी भरावा लागणार आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण शेवटी अर्ज सबमिट करा या पर्यावरण आपला अर्ज सबमिट करू शकता अर्ज नोंदणी केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एसएमएस देखील पाठवण्यात येईल त्या एसएमएस च्या आधारे आपल्याला पुढील कार्यवाही करावी लागणार आहे तसेच या E samrudhi portal पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपण भविष्यात आपल्याला मिळणारे पैसे याबद्दलची माहिती देखील या पोर्टलवर सहज पाहू शकता.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.