fawarani pump list फवारा पंप निवड यादी अशी पहा.
राज्य शासनाकडून एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना 2024 -25 अंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी वर चालणाऱ्या फवारणी पंपाचे वितरण करण्याचे धोरण आखले. यामध्ये शेतकऱ्यांनी अर्ज केले अर्ज करताना शेतकऱ्यांना पोर्टलच्या माध्यमातून अडचणी येत असल्यामुळे तीन वेळा सरकारकडून यामध्ये अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आता ज्या शेतकऱ्याने अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने करण्यात आली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांनी आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही तसेच निवड झाली आहे का हे कसे तपासावे याबद्दलची माहिती आपण पाहूया.
fawarani pump list निवड यादी कोठे पाहता येईल
ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी अंतर्गत बॅटरी फवारा योजनेसाठी अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांनी आपली निवड झाली आहे हे पाहण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर जाणे आवश्यक आहे आता ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना SMS देखील पाठवण्यात आले आहे परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना एसेमेस आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपले नाव निवड यादीत आले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी खालील चरणांचा अवलंब करावा.
हे वाचा : सोयाबीन व उडीद हमीभावाने खरेदी होणार
अशी तपासा निवड यादी
सर्वप्रथम आपण शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल. आपल्यासमोर उजव्या साईटला सूचना या टॅब मध्ये आपल्याला निवड यादी लॉटरी हा पर्याय दिसेल. यामध्ये 8 सप्टेंबर 2024 रोजी झालेली निवड यादी या पर्यायावर आपल्याला क्लिक करावे. लागेल त्यानंतर त्या ठिकाणी आपला जिल्हा, आपला तालुका निवडून घ्यावा लागेल व यादी पहा या पर्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्यासमोर आपल्या तालुक्यातील निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल ज्या शेतकऱ्यांची नावे असतील त्या शेतकऱ्यांना कृषी कार्यालय मार्फत बॅटरी स्वयंचलित फवारा पंप वितरित केला जाणार आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.