E SHRAM CARD भारत केंद्र सरकारने देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी व असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी. देशांमध्ये असंघटित कामगारासाठी ई श्रम कार्ड योजना लागू केली या कार्डच्या माध्यमातून देशात असणाऱ्या विविध असंघटित कामगारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी एक ओळखपत्र तयार करून दिले जाते.
मागील बरेच दिवसापासून आपण पाहत आहोत की ई श्रम कार्ड अंतर्गत 3000 हजार रुपये महिना मिळणार. ई श्रम कार्ड(E SHRAM CARD) धारकांना प्रति महिना 3000 हजार रुपये पेन्शन मिळणार. याबद्दलच्या बातम्या आपण वाचल्या असतील परंतु यामागील नेमकी सत्यता काय आणि हा लाभ घेण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
E SHRAM CARD कोणाला मिळते ई श्रम कार्ड.
- लाभार्थी भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार हा असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार असावा.
ई श्रम कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- चालू मोबाईल नंबर
- नोंदणीसाठी स्वतः अर्जदाराने बायोमेट्रिक देऊन सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे.
कसा मिळतो 3000 महिणा.
ज्या असंघटित कामगारांनी आपली नोंदणी ई श्रम पोर्टल वर करून आपले ई श्रम कार्डब (E SHRAM CARD) तयार केले आहे. त्या नागरिकांसाठी ई श्रम पोर्टलवरच ई श्रम पेन्शन योजना या नावाने लाभ दिला जातो. आता या योजने अंतर्गत लाभ दिला जातो. हा लाभ अर्जदाराच्या वयाच्या साठ वर्षानंतर अर्जदाराला प्रति महिना 3000 हजार रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो. परंतु यासाठी अर्जदाराला आधी अर्जदाराचे वय वर्ष 60 होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम भरणे आवश्यक असतं. ती रक्कम प्रत्येक महिन्याला भरलेल्या लाभार्थ्यालाच 60 वर्षानंतर 3000 हजार रुपये प्रति महिना पेन्शन त्यांच्या बँक खात्यावर वितरित केली जाणार आहे.
हे वाचा: ई श्रम कार्ड नोंदणी प्रक्रिया.
लक्षात असू द्या जर आपण फक्त ई श्रम कार्ड काढले असेल आणि ई श्रम पेन्शन योजना अंतर्गत नोंदणी केली नसेल; तर आपल्याला कसल्याही प्रकारचं 3000 रुपये प्रति महिना मानधन मिळणार नाही . त्याकरिता आपल्याला पोर्टलवर पेन्शन साठी नोंदणी करून पेन्शनची रक्कम भरण्यासाठी आपल्या बँक खट्यामधून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक महिन्याला आपल्या बँक खात्यावरून एक ठराविक रक्कम जी आपल्या वयानुसार ठरविण्यात आलेली असते. ती रक्कम बँकेकडून संबंधित विभागाला जमा केली जाईल . व वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला प्रति महिना 3000 हजार रुपये या प्रमाणात पेन्शन दिली जाईल.
1 thought on “ई श्रम कार्ड धारकांना कसे व कधी मिळणार 3000 रुपये महिना. E SHRAM CARD”