Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारताच कामाचा जोरदार आरंभ केला आहे. गृहनिर्माण विभागाच्या धोरणांसाठी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय गृहनिर्माण विभागाकडून शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन करण्यात आलं, त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरण पूरक गृहनिर्माण धोरणांना चालना ,ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगारांसाठी खास योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
सादरीकरणांमध्ये कोणकोणती मुद्दे मांडण्यात आली
3 जानेवारी रोजी गृहनिर्माण विभागाकडून गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आलं . या सादरीकरणामध्ये परवडणाऱ्या पर्यावरण पूरक गृहनिर्माण धोरणाला चालना तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारी रेंटल हाउसिंग आणि गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधणीचं टार्गेट या संदर्भातील मुद्दे सादरीकरणांमध्ये मांडण्यात आले . तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असे म्हणाले की या संदर्भात पुढच्या महिन्यात सविस्तर धोरण तयार होणार आहे .
हे वाचा : लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी; शासन निर्णयानुसार पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळणार लाभ.
परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना
गृहनिर्माण विभागाने सादर केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणावर विशेष भर देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वस्त आणि पर्यावरणस्नेही घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात याबाबत सविस्तर धोरण तयार होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पुढील महिन्यात या धोरणाचा सविस्तर आराखडा तयार होणार आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल घडेल.
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरांचा निर्धार
गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या असून त्यावर लवकरच निर्णय होईल. विशेष म्हणजे, गिरणी कामगार ज्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, तिथेच त्यांना घरे उपलब्ध करून देण्याबाबतही विचार सुरू आहे.
रेंटल हाऊसिंगसाठी नव्या योजना
परवडणाऱ्या रेंटल हाऊसिंगसाठी स्वतंत्र धोरणाची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, शहरात राहणाऱ्या मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना स्वस्तात भाडेतत्त्वावर घरे मिळतील.
मराठी भाषेवर भर Eknath Shinde
गृहनिर्माण विभागाच्या प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइडचा वापर पाहून उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी नाराजी व्यक्त केली. मराठी स्लाइड्स तयार करण्याचे निर्देश देत, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या भूमिकेने मराठी भाषेचा सन्मान कायम ठेवण्याचा संदेश दिला आहे.
नव्या धोरणांमुळे दिलासा
2007 नंतर गृहनिर्माण विभागाने कोणतेही धोरण तयार केले नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )यांच्या नेतृत्वाखाली आता गृहनिर्माण विभागाने धोरणात्मक पाऊले उचलली आहेत. ज्येष्ठ नागरिक, गिरणी कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी या योजना लाभदायक ठरणार आहेत.
निष्कर्ष
एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यानंतर लगेचच कामाचा धडाका सुरू केला आहे. परवडणाऱ्या घरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना आणि गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्धार यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.Eknath Shinde
1 thought on “Eknath Shinde : पदभार स्विकारताच गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत कामाचा धडाका, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी.”