farmer account hold शेतकऱ्यांच्या खात्याचा होल्ड न काढल्यास कारवाई बँकांनी थकबाकी पिक कर्जाच्या वसुलीसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलेली आहे. हे होल्ड लावल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर काही व्यवहार करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान योजना, सोयाबीन अनुदान, लडकी बहीण आणि शासकीय अनुदानाची रक्कम जमा होऊन पण शेतकऱ्यांना ती काढता येत नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊन पण दिवाळी आणि दसरा अशा सणासुदीच्या तोंडावर हे पैसे काढता येत नाहीत.
त्यामुळे खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनी बँकांना लवकरात लवकर होल्ड काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करा, अन्यथा अनुदाना न वितरित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा बँकांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
कळम पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी आयोजित जनता दरबारात बँकेच्या प्रतिनिधींना त्यांनी चांगलाच दम भरला . त्यावेळेस आमदार कैलास घाडगे पाटील, तहसीलदार हेमंत ढोकले, आणि गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर , तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश वायकर यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जनता दरबारात सार्वजनिक रस्ते, शेतातील वीज प्रश्न आणि शासकीय अनुदानाबाबत विविध प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले. तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान, सोयाबीन व कापूस अनुदान, लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी खाते होल्ड केल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही, याबद्दलची माहिती बँकांकडून योग्य पद्धतीने न देता अडवणूक केली जाते, असे प्रश्न शेतकऱ्यांना मांडले. या शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारीवर खासदार राजेनिंबाळकर बँकांच्या अधिकाऱ्यावर चांगले संतापले व त्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना असा इशारा केला की शेतकऱ्यांचे खाते सुरळीत करा नाहीतर कारवाई करण्यात येईल.अशी बँकांच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.farmer account hold
farmer account hold बँकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई
बँकांच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर होल्ड काढून पैसे वितरित करावेत, नाहीतर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ठोक इशारा करण्यात आलेला आहे. तालुक्यातील सोयाबीनचे 80 टक्के क्षेत्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
हे वाचा : बांधकाम कामगारांच्या मुलांना एवढी मिळते शिष्यवृत्ती
तालुक्यातील बोरवंडी येथील जलजीवनचे पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन देण्यात आले नाही. अशी महावितरण अधिकारी यांना सूचना देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्र असते कोणीही अडवू नये, अन्यथा अडवणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, असे आदेश राजेनिंबाळकर यांनी दिले.
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
farmer account hold गेल्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस आलेले होते त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक बऱ्याच ठिकाणी पाण्याखाली जाऊन वाया गेले आहे . तसेच कांद्याच्याही पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून अहवाल द्यावा, अशी सूचना खासदार राजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना केले आहेत. किल्लारी (ता. औसा) या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते म्हणाले, एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. जर मदतीपासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकारी याला जबाबदार राहतील, असे राजेनिंबाळकर म्हणाले.