farmer benefits in maharashtra इंदापूर कृषी महोत्सव २०२५ च्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. “शेतीत प्रगती साधायची असल्यास शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे, आणि शेतकरी संशोधक बनला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
राज्यातिल शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सरकार शेतकरी हिताच्या योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार नेहमी शेती संबंधी योजना राबवते परत्नू या योजनेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी भ्रष्टाचार करत असल्याचे सरकार च्या निदर्शनास आले आहे. सध्या राज्यात शेतकऱ्यांसाठी महत्वाची पीक विमा योजना या मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार केल्याचे सरकार च्या लक्षात आले आहे. या वरूनच अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत.

कृषी क्षेत्रातील संधी आणि आव्हाने
आपल्या कृषी प्रधान देशात शेतीमध्ये प्रचंड क्षमता आहे, असे सांगत पवार म्हणाले की, शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी विकासाला प्रोत्साहन देऊन अनेक संधी निर्माण करता येऊ शकतात. मात्र, सध्या शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. जागतिक हवामान बदलामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होण्याचा धोका आहे. तसेच, निविष्ठा खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, तर लांब व खंडित जमीन उत्पादकतेत अडथळा निर्माण करते. या समस्यांवर मात करून शेतकऱ्यांना पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक farmer benefits in maharashtra
अजित पवार यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, माफक पाणी वापरण्याच्या पद्धती, चांगल्या प्रकारची फळे व फुले पिकविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कौतुक केले, कारण त्यांनी डाळिंब, केळी, द्राक्षे, पेरू आणि ड्रॅगन फ्रुट यांसारख्या फळबागांच्या उत्पादनात आघाडी घेतली आहे.
इंदापूर कृषी महोत्सवातील वैशिष्ट्ये
farmer benefits in maharashtra या कृषी महोत्सवात आधुनिक तंत्रज्ञानाची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू यांची प्रदर्शने भरवण्यात आली होती. तसेच, जातिवंत जनावरे, खिलार बैल, गाई, दोनशे प्रकारचे घोडे आणि वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो इत्यादी आकर्षणे पाहायला मिळाली. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना नवी माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते, असे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा
शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. तसेच, शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मात्र, सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार होऊ नयेत, याचीही त्यांनी सूचना केली.
प्रगतीसाठी संशोधन महत्त्वाचे
शेतकऱ्यांनी संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवून शेतीत नवनवीन प्रयोग करावेत, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता, पाण्याचा काटेकोर वापर, ऊसाचे उत्पादन वाढवणे यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
निष्कर्ष
अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह संशोधक वृत्ती जोपासण्याचा सल्ला दिला. इंदापूर कृषी महोत्सवासारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, साधने आणि माहिती मिळते. यामुळे शेतीत प्रगती करण्यासाठी एक सकारात्मक दिशा मिळेल.
1 thought on “farmer benefits in maharashtra : राज्यातिल शेतकऱ्यांना मोठी मदत करणार पण; गैर फायदा नको: ajit pawar”