Farmer Id :फार्मर आयडी नंबर मिळण्यास सुरुवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे ऑनलाइन स्टेटस? पहा सविस्तर.

Farmer Id : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्यांकडे आयडी कार्ड असणे बंधनकारक आहे. यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ॲग्री स्टॉक या योजनेत नोंदणी करणे अनिवार्य आहे. ॲग्री स्टॉक योजनेची घोषणाही गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात आली होती.
आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक नागरिकांना आधार कार्ड हे बंधनकारक आहे तसेच आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Farmer Id) कार्ड हे बंधनकारक आहे. या फार्मर आयडीवर एक आधार कार्ड प्रमाणेच नंबर असतो तो नंबर आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहेत त्या शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Farmer Id

Farmer Id कार्ड योजनेचा उद्देश

आता राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅन कार्ड प्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर)देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे .
शेतकऱ्यांचे आधार क्रमांक,बँक खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती एकत्रित असावी,हा या योजनेचा उद्देश आहे.त्यामुळे राज्य सरकारच्या ऍग्री स्टॉक योजनेअंतर्गत (Farmer Id) ही प्रक्रिया राबवली जात असून,शेतकऱ्यांनी आता आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे.

हे वाचा : रेशन आता घरबसल्या करता येणार केवायसी : अशी करा केवायसी आपल्या मोबईल वरुन.

शेतकऱ्यांना या फार्मर आयडी कार्डचा उपयोग कशासाठी होणार?

जर शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक योजनेअंतर्गत फार्मर आयडी (Farmer Id) कार्ड बनवले तर .
सरकारी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सहजरित्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे . मध्यस्थानाची भूमिका कमी करणे .शेतकऱ्यांना आयडी कार्ड बनवून घेतल्यानंतर वारंवार केवायसी करण्याची गरजपडणार नाही . तसेच पीएम किसान योजनेची पडताळणी पण सोपी होणार आहे .
तुझ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा एक मेसेज यायला सुरुवात झालेली आहे .
जर तुम्हाला हा मेसेज आला नसेल आणि तुमच्या फार्मर आयडीच्या अर्जाची स्थिती त्याचे स्टेटस पाहिजे असेल तर ते कसे पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया .

कसे चेक कराल तुमच्या फार्मर आयडी चे स्टेटस?

  • शेतकऱ्यांना सर्वप्रथम सुरुवातीला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
  • त्यानंतर तुम्हाला Enrollment id आणि Aadhaar No अशी दोन ऑप्शन दिसतील.
  • वरील दोन ऑप्शन मधील Enrollment id किंवा Aadhaar No या दोन्हीपैकी कोणत्याही एका ऑप्शन वर जे तुम्हाला माहित आहे त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही जो ऑप्शन क्लिक केला आहे त्याप्रमाणेच खालील चौकोनात नंबर टाकावा.
  • त्यानंतर चेक वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे ते पाहायला मिळेल.
  • जर तुमचा अर्ज अप्रूव्हल झालेला नसेल तर तुम्हाला तेथे pending असे पाहायला मिळेल आणि जर तुमचा अर्ज अप्रुव्हल झाला असेल तर तुम्हाला 11 अंकाचा सेन्ट्रल आयडी पाहायला मिळेल व त्यापुढेApproved असे स्टेटस दिसेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकाल Farmer Id.

शेतकरी ओळखपत्र डाउनलोड करता येते का?

शेतकरी ओळखपत्र स्टेटस तपासल्या नंतर बहुतांश शेतकऱ्यांचे स्टेटस मंजूर स्थिति मध्ये आहेत. मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देखील देण्यात आला आहे. शेतकरी ओळख पत्र विशिष्ट क्रमांक मिळाला परंतु शेतकऱ्यांना कार्ड डाउनलोड करता येते का? खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये कार्ड डाउनलोड बाबत संपूर्ण सविस्तर माहिती पहा.

1 thought on “Farmer Id :फार्मर आयडी नंबर मिळण्यास सुरुवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे ऑनलाइन स्टेटस? पहा सविस्तर.”

Leave a comment

Close Visit Batmya360