MTDC :महिलांसाठी आनंदाची बातमी!MTDC कडून महिला पर्यटकांसाठी 50 टक्के सवलत, महाराष्ट्र पर्यटन मंत्री यांची घोषणा…

MTDC : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त , राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये एमटीडीसी च्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे. अशी घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आई महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे.

MTDC

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, एमटीडीसी ने महिलांसाठी महिलांसाठी समर्पित आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अमलात आणले आहे. शंभूराज देसाई म्हणाले आम्ही महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्हाला मागच्या वर्षी 2024 मध्ये एमटीडीसीच्या महिला दिन विशेष सवलतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळेस 1500 हून जास्त महिला पर्यटकांनी या योजनेचा सहभाग घेतलेला होता. त्यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, 2025 मध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या महिलांना या सवलतीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन लाभ घेऊ शकतात.

हे वाचा :फार्मर आयडी नंबर मिळण्यास सुरुवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे ऑनलाइन स्टेटस? पहा सविस्तर.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

पर्यटनात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन

राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा एक विशेष उपक्रम आहे. MTDC ची नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि खारघर (नवी मुंबई) येथील महिला -संचालित पर्यटन निवास संपूर्ण महिला द्वारे संचालित केली जातात ,त्या रिसॉर्टचे कामकाज,सुरक्षा,घरकाम,स्वच्छता ,टॅक्सी सेवा आणि हॉटेलिंग सर्व जबाबदार या महिलांकडे आहेत . त्यामुळे महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

महिला पर्यटकांसाठी विशेष 30 दिवसांची सवलत

1 ते आठ मार्च 2025 आणि वर्षभरातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस 50 टक्के सवलत देण्यात येणार असून या 22 दिवसाची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.

महिला पर्यटकांसाठी विशेष उपक्रम

एमटीडीसी ने महिलांसाठी अधिक समावेश पर्यटन अनुभव निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाईल तसेच हेरिटेज वॉक,सहसी पर्यटन,शैक्षणिक सहली आणि पर्यटन मार्गदर्शक प्रशिक्षण.महिला गाइड्स आणि जल पर्यटन प्रशिक्षकांना संधी दिली जाणार आहे .महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजन उपक्रम देखील असतील .

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

Leave a comment