farmer id: कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक…

farmer id : दिनांक 15 एप्रिल 2025 पासून राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. राज्य शासनाने याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करत कृषी विभागाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. दिनांक 15 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर. शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख (farmer id) क्रमांक असणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक नसेल अशा शेतकऱ्यांना कृषी विभागांतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. farmer id

farmer id

Farmer id असणे बंधनकारक

राज्य शासनाने 10 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय तयार करून या शासन निर्णयाच्या माध्यमातून कृषी विभागाला काही सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक असेल अशा शेतकऱ्यांना यापुढे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहे. याची अंमलबजावणी 15 एप्रिल 2025 पासून करण्याच्या देखील सूचना दिले आहेत. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना कृषी विभाग अंतर्गत असणाऱ्या योजनांचा लाभ मिळवायचा असेल त्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख (farmer id) क्रमांक असणे बंधनकारक झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक नसेल अशा शेतकऱ्यांना कृषी विभाग अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कोणत्या योजनेचा लाभ दिला जाऊ नये असे या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. या दिलेल्या सूचनांचे पालन 15 एप्रिल 2025 पासून सुरू करावे अशा देखील सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.farmer id

हे वाचा : आजच करा हे काम!..अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोणत्या योजनाचा मिळणार नाही लाभ

ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी विशिष्ट क्रमांक नाही अशा शेतकऱ्यांना यापुढे कृषी विभागाच्या कोणत्या योजनांचा लाभ दिला जाणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे. यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही याची यादी खालील प्रमाणे:-

  • प्रधानमंत्री पिक विमा योजना
  • शेतकरी कर्जमाफी
  • नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई
  • शेती आवश्यक पीक कर्ज
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
  • नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
  • शासकीय हमीभावाने पिकाची विक्री करणे
  • महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना वितरित केल्या जाणाऱ्या योजना.
  • कृषी यांत्रिकीकरण योजना
  • मागील त्याला विहीर योजना
  • मागेल त्याला शेततळे योजना
  • सूक्ष्म सिंचन योजना

या व यासारख्या कृषी विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या कोणत्या योजनेचा लाभ शेतकरी ओळखपत्र नसताना शेतकऱ्यांना दिला जाणार नाही.

याबाबत शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक आहे. त्या शेतकऱ्यांना यापुढे कृषी विभाग अंतर्गत सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा. जर आतापर्यंत आपण शेतकरी विशिष्ट क्रमांक साठी नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी.

नोंदणी करण्यासाठी आपण स्वतः देखील राज्य शासनाने तयार केलेल्या शेतकरी ओळखपत्र या वेबसाईटवर जाऊन आपले शेतकरी ओळखपत्र तयार करून घेऊ शकता. किंवा आपल्याजवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी जाऊन देखील आपण आपल्या शेतकरी विशिष्ट क्रमांक साठी अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी अर्जदाराचा मोबाईल सर्व जमिनीचा तपशील ज्यामध्ये सातबारा आठ या कागदपत्रांची आवश्यकता लागते. farmer id

Leave a comment