farmer id card edit option : शेतकरी ओळखपत्र माहिती दुरुस्ती पर्याय कधी.

farmer id card edit option केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीचे करण्यासाठी देशात ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यास मंजुरी दिली. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचे डिजिटलायझेशन करून जमिनी बद्दलची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार कडून 3000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना एक ओळखपत्र वितरित केला जाणार आहे. या ओळखपत्र च्या माध्यमातून शेतीची संपूर्ण माहिती तसेच जमीन मालकाची माहिती त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपूरक योजना व शेतीसाठी आवश्यक असणारे खते, बी बियाणे तसेच इतर सुविधांसाठी हे शेतकरी ओळखपत्र आवश्यक असणार आहे. या ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत तसेच पीएम किसान, नमो शेतकरी योजना यासारख्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी देखील हे शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांना काढणे गरजेचे आहे.

farmer id card edit option

ओळखपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

देशातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे. हे ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड, आपल्या जमिनीचा तपशील, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती आवश्यक आहे. ओळखपत्र काढण्यासाठी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्र या ठिकाणी जाऊन आपण आपले शेतकरी ओळखपत्र तयार करू शकता.

ओळखपत्र काढताना चुक झालीय? farmer id card edit option

farmer id card edit option बऱ्याच शेतकऱ्याकडून ओळखपत्र काढताना अपुरी माहिती भरण्यात आलेली आहे. भरलेली माहिती काही प्रमाणात चुकली आहे. यात सर्वाधिक चुका या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत याचे कारणही तसेच आहे. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये बीड जिल्ह्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आलेले आहेत.

सर्वाधिक चुका बीड जिल्ह्यातच का ?

राज्यात आधीच चर्चेत असणारा बीड जिल्हा आता शेतकरी ओळखपत्रात सुद्धा सर्वाधिक चुका कशा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो त्याच कारण देखील तसंच आहे. केंद्र शासनाने मागील वर्षी प्रत्येक राज्यातील एका जिल्ह्यांतर्गत ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्र कृषी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून तयार करण्यात आले होते.

यामध्ये प्रामुख्याने कृषी सहाय्यक आणि तलाठी यांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्रे तयार करण्यात आली होती. शेतकरी ओळखपत्र तयार करताना यामध्ये सर्वच शेतकऱ्यांची जमीन तपशील चुकीची भरली गेली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना अल्पभूधारक आणि बहुभूधारक असे दोनच पर्याय देण्यात आले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची माहिती चुकीची भरलेली आहे. या मध्ये 1 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर 0.40 ऐवजी 1.99 हेक्टर जमीन दाखवत आहे. या पद्धतीच्या चुका जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत. farmer id card edit option

दुरुस्ती पर्याय कधी

. सध्या शेतकरी ओळखपत्र करताना चूक झाली असल्यास दुरुस्तीचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. परंतु संबंधित विभागाला विचारणा केली असता; त्यांच्याकडून येत्या काही दिवसातच दुरुस्ती पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांना पोर्टलवर दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. दुरुस्ती पर्याय पोर्टलवर उपलब्ध झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची माहिती चुकीची भरलेली आहे अशा शेतकऱ्यांना दुरुस्ती करता येईल. दुरुस्तीच्या पर्याय उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्ती करण्यासंबंधीच्या सूचना देखील संबंधित विभागाकडून दिल्या जातील.

शेतकरी ओळखपत्र अधिकृत संकेतस्थळ. https://mhfr.agristack.gov.in/

farmer id card edit option सद्यस्थिति मध्ये तरी कोणतीही दुरुस्ती करता येत नाही. चुकीची माहिती भरलेल्या शेतकऱ्यांना तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपली माहिती दुरुस्त करण्यासाठी व आपले नवीन कार्ड काढण्यासाठी दुरुस्ती पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360