Farmer Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारी अनुदान या तारखेपर्यंत…खात्यावर होणार जमा..!

Farmer Subsidy : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कृषी व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी असे आदेश राज्य शासनाकडून सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 मे पूर्वी जमा करण्यात येईल.

कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार, 28 एप्रिल पासून सुरू झालेला सेवा पंधरवडा 12 मे पर्यंत सुरू राहणार आहे .या कालावधीमध्ये महाडीबीटी प्लॅटफॉर्मवर आणि सर्व संबंधित विभागाच्या पोर्टल वरील प्रलंबित अर्जाचा निवड केला जाणार आहे .विशेषता: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना याच काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा (Farmer Subsidy) केली जाईल .

तसेच या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या फेराफार नोंदी ,मालमत्ता हस्तांतरण,ग्रामीण भागातील नागरिकांना अंतर्गत स्वस्त धान्याचे वितरण सेवा देखील याच पंधरवड्यापूर्ण करण्यात येणार आहे .Farmer Subsidy

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा
Farmer Subsidy

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेला गती

राज्य शासनाने या सेवेच्या निमित्ताने अनुसूचित जाती जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेला गती देण्याचे ठरवण्यात आले आहे .या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीसाठी सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी प्राधान्याने घेतली जाईल आणि आवश्यक लाभ तात्काळ दिला जाणार आहे.Farmer Subsidy

प्रगती अहवाल बंधनकारक

राज्य शासनाकडून वारंवार सूचना देण्यात आलेल्या असतानाही अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही, तसेच अर्ज प्रलंबितच राहिले आहेत. त्यामुळे यावर्षी सरकारने प्रत्येक विभागाला कार्याचा प्रगती अहवाल विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरी नंतरच सादर करणे बंधनकारक केले आहे .

महसूल विभागाच्या सूत्रानुसार,वन हक्क पट्टे लवकरात लवकर मंजूर करणे,सर्व योजनांच्या लाभांचे लवकरात लवकर वितरण व सेवा नोंदणी पूर्ण करणे, हे यावर्षीच्या पंधरवड्याचे केंद्रबिंदू असणार आहे .

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

शिबिरे,तसेच क्षेत्रीय भेटी आवश्यक

या पंधरवड्यातील उद्दिष्टांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली की नाही,यासाठी संबंधित जिल्हास्तरीय आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट घ्याव्यात,तसेच शिबिरे आयोजित करावे,असे निर्देश सरकारकडून करण्यात आले असून याची विभागीय स्तरावरील काटेकोर निरीक्षण करण्यात येणार आहे .

या सेवा पंधरवडा दरम्यान लाभार्थ्यांसाठी निधी वितरित आणि अर्जाचा निवडा व प्रलंबित सेवा चे पूर्णत्त्व या गोष्टीना प्राधान्य देण्यात आले आहे .यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी वेळेवर व्यवस्थित काम पूर्ण करून अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे. Farmer Subsidy

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment